पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – हिंजवडी जवळील नेरे दत्तवाडी येथील एक्झर्बीया सोसायटीत पोलिसांनी छापा टाकून एकाला अटक केली. त्यांच्याकडून गांजा हस्तगत केला. ही कारवा२ ५ जून रोजी करण्यात आली.
ऍडविन अँथोनी फर्नाडीस (वय ३२, रा. नेरे दत्तवाडी, मुळशी) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस शिपाई ओमप्रकाश श्रीरंग कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून २५ हजार १७२ रुपये किमतीचा गांजा, वजनकाटा आणि इतर साहित्य जप्त केले आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
हिंजवडीतून २५ हजारांचा गांजा जप्त
