हिंजवडीतून २५ हजारांचा गांजा जप्त

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – हिंजवडी जवळील नेरे दत्तवाडी येथील एक्झर्बीया सोसायटीत पोलिसांनी छापा टाकून एकाला अटक केली. त्‍यांच्‍याकडून गांजा हस्‍तगत केला. ही कारवा२ ५ जून रोजी करण्‍यात आली.
ऍडविन अँथोनी फर्नाडीस (वय ३२, रा. नेरे दत्तवाडी, मुळशी) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस शिपाई ओमप्रकाश श्रीरंग कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून २५ हजार १७२ रुपये किमतीचा गांजा, वजनकाटा आणि इतर साहित्य जप्त केले आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *