पतीने पत्नीला केली दांडक्याने मारहाण
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – तू तुझ्या आई-वडिलांकडे का गेली होतीस? या किरकोळ कारणावरून पतीने आपल्या पत्नीला फावड्याच्या दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना १७ जुलै रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास थेरगाव येथील गणेश कॉलनीमध्ये घडली.
सचिन मच्छिंद्र लोंढे (वय २४, रा. गणेश कॉलनी, थेरगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्याची पत्नी मानसी सचिन लोढे (वय १९) हिने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मानसी ही आई-वडिलांकडे गेली असल्याच्या रागातून आरोपी पतीने घरात शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने घरातील फावड्याचे दांडके घेऊन मानसीच्या दोन्ही हातांवर, पोटरीवर, कोपरांवर आणि कानावर मारहाण करत तिला गंभीर जखमी केले. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.