वाहनाला दुचाकी धडकून एकाचा मृत्यू
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – रस्त्यावर वाहन थांबवल्यामुळे झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात १५ जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास काळेवाडी फाटा ते औंध रोडवर, वाकड फाटा बीआरटी बस स्टॉपसमोर घडला.
निलेश किसन सूर्यवंशी (वय ३६, रा. शिवराज कॉलनी, थेरगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मयताचे पुतणे गणेश चंद्रभान गुरखा (वय २८, रा. वडगाव बुद्रुक, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे चुलते गगनसिंग रामसिंग सोनार (वय ५६) हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना, आरोपीने त्याचे वाहन रस्त्यावर उभे केले होते. या उभ्या वाहनाला दुचाकीची पाठीमागून धडक बसल्याने गगनसिंग यांचा मृत्यू झाला. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.