दोन पिस्तुलसह दोन तरुण जेरबंद

पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – कासारवाडी परिसरातील फूटपाथवर बेकायदेशीरपणे दोन देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे बाळगणार्‍या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 22 एप्रिल) रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
यश नंदकिशोर कांबळे (वय 19, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) आणि अथर्व सुनील भोकरे (वय 21, रा. नवी सांगवी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार प्रविण दौलत पाटील यांनी बुधवारी (दि. 22 एप्रिल) रोजी याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कासारवाडी ते भोसरी-सांगवी ओव्हर ब्रीज दरम्यान आरोपी संशयास्पद रित्या मिळून आले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे एक लाख 31 हजार रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे आणि दोन रिकामे मॅगझीन सापडले. शहरात घातक शस्त्र बाळगण्यास बंदी असतानाही विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोडी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *