भेटायला बोलवून तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) – एका तरुणाला भेटायला बोलावून त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 26 मे) रोजी रात्री साडेआठ वाजता चिखली येथील संविधान चौकात घडली आहे.
अमित तानाजी जानराव (रा. निसर्ग बिल्डिंग, घरकुल, चिखली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजय रवि कांबळे (वय 28, रा. अजिंठानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित याने फिर्यादी विजय यांना चिखली येथील संविधान चौकात भेटण्यासाठी बोलावून घेतले. तिथे विनाकारण वाद घालून आरोपीने त्याच्याकडील कोयत्याने विजयच्या डोक्यावर, डाव्या हाताच्या पंजावर आणि उजव्या हाताच्या बोटांवर वार करून गंभीर दुखापत केली. या घटनेचा पुढील तपास चिखली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लांडगे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *