Delhi-जंतर-मंतर आंदोलनात तणाव; गीतांजली वांगचुक यांच्याशी गैरवर्तनाचा आरोप

नवी दिल्ली :

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर CJP चे सौरव दास यांनी सोशल मीडियावर गंभीर आरोप केले आहेत.

सौरव दास यांनी केलेल्या पोस्टनुसार, दिल्ली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांच्याशी गैरवर्तन केले. त्यांना मारहाण करण्यात आली तसेच त्यांचे केस ओढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या आरोपांमुळे आंदोलनस्थळी घडलेल्या घटनांबाबत नव्याने वाद निर्माण झाला असून, या प्रकरणावर दिल्ली पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. तसेच या आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, जंतर-मंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *