नवराई माझी लाडाची लाडाची गं!” सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई; रेवती सुळेने बांधल्या मुंडावळ्या

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरात सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. घरात लगीनघाई सुरू असून पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या काही व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये सुळे कुटुंबातील सदस्य पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत दिसत आहेत. या क्षणांमध्ये खास आकर्षण ठरले आहे ते म्हणजे रेवती सुळे यांनी बांधलेल्या मुंडावळ्या आणि घरातील स्त्री सदस्यांनी पारंपरिक गाणी गात केलेला उत्साही माहोल.

“नवराई माझी लाडाची लाडाची गं!” या लोकप्रिय लग्नगीतावर घरात महिलांनी फेर धरत आनंद व्यक्त केला. या क्षणांनी संपूर्ण वातावरणात सणासुदीचा माहोल निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *