Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

pimpri chinchwad-‘पॅकेज’शिवाय लग्न नाही; पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणांचे विवाह रखडले

By Sumedh Chapalgaonkar
April 23, 2026 2 Min Read
0

पिंपरी(pimpri chinchwad)– शहरात नोकरी, फ्लॅट आणि गावाकडे शेतीच्या अटी; पस्तीशी ओलांडली तरी अनेक जण अविवाहित

“मुलीचे लग्न कसे करायचे?” हा प्रश्न आता बदलत्या काळात “मुलाचे लग्न कसे जमवायचे?” असा झाला आहे. पिंपरी-चिंचवड आणि परिसरात वाढत्या अपेक्षा, आर्थिक निकष आणि सामाजिक बदलांमुळे अनेक तरुणांचे विवाह रखडत असून ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

औद्योगिक आणि आयटी क्षेत्राच्या वाढीसोबत शहरातील विवाहसंस्कृतीत मोठा बदल झाला आहे. वधूपक्षाकडून आता केवळ मुलाचा स्वभाव किंवा कुटुंब पाहिले जात नसून त्याची नोकरी, पगार, स्थावर मालमत्ता आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्य यालाच प्राधान्य दिले जात आहे. परिणामी, शेती करणारे किंवा लहान व्यवसाय करणारे तरुण या स्पर्धेत मागे पडत आहेत.

उच्चशिक्षण आणि करिअरच्या धावपळीत अनेक तरुणांचे वय ३० च्या पुढे गेले आहे. चांगल्या पगाराची नोकरी किंवा स्थिर व्यवसाय उभा करताना लग्नाचा विषय मागे पडतो. मात्र नंतर स्थळ शोधताना अपेक्षांचा डोंगर समोर उभा राहतो. आयटी क्षेत्रात नोकरी करणारे किंवा सरकारी सेवेत असलेले तरुण सहज पसंतीस पडतात, तर ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्यांना नकाराचा सामना करावा लागतो.

सध्या वधूपक्षाकडून ठेवण्यात येणाऱ्या अटींमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरात नोकरी असावी, स्वतःच्या नावावर फ्लॅट असावा आणि त्याचवेळी गावाकडे शेती व घरही असावे, अशा तिहेरी अपेक्षा अनेक ठिकाणी व्यक्त केल्या जात आहेत. या अटी पूर्ण करणे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी कठीण ठरत आहे.

या परिस्थितीचा फायदा घेत लग्न जुळवणाऱ्या दलाल आणि मॅरेज ब्युरोंची संख्या वाढली आहे. स्थळ दाखवण्यासाठीच पैसे घेणे, लग्न ठरल्यावर मोठी रक्कम मागणे असे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी फसवणुकीच्या घटनाही पुढे येत असल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे.

पिंपरी-चिंचवड लगतच्या मावळ आणि ग्रामीण भागात शेती करणाऱ्या तरुणांसाठी ही समस्या अधिक तीव्र आहे. “शेतकरी नवरा नको ग बाय” या मानसिकतेमुळे अनेक सुशिक्षित आणि कष्टाळू तरुण विवाहापासून वंचित राहत आहेत. यामुळे सामाजिक समतोल बिघडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, मुलींचे शिक्षण आणि स्वावलंबन वाढणे हे सकारात्मक असले तरी अपेक्षांचा अतिरेक टाळणे गरजेचे आहे. विवाह हा केवळ आर्थिक व्यवहार न राहता समजुती, संस्कार आणि कुटुंबव्यवस्थेचा भाग राहावा, यासाठी समाजाने विचार करण्याची वेळ आली आहे.

एकीकडे करिअरच्या स्पर्धेत पुढे जाण्याची धडपड आणि दुसरीकडे विवाहासाठी वाढत्या अटींचा दबाव यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील अनेक तरुण अडकले असून, या प्रश्नावर सामाजिक स्तरावर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Tags:

No Marriage Without a Package Weddings of Young Men in Pimpri Chinchwad Stalled
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

Pimpri Chinchwad: तप्त उन्हाचा आरोग्यावर घाव; पिंपरी-चिंचवडमध्ये डोळे-त्वचारोगात वाढ

Next

​पिंपरी-चिंचवडमध्ये टोळ्यांचे पेव; ‘मोक्का’चा धाक ओसरला?

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme