सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याबद्दल सायोनी घोष यांचे स्वागत; विरोधकांवर राजकारणाचा आरोप
नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतल्यानंतर बंडखोर तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार सायोनी घोष यांनी त्यांचे स्वागत केले आहे. देशाच्या हिताचा विचार करून हा निर्णय झाल्याचे सांगतानाच त्यांनी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावरून विरोधी पक्षांवर राजकारण केल्याचा आरोप केला.
सायोनी घोष म्हणाल्या, “सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले, याबद्दल मी त्यांची आभारी आहे. विद्यार्थीही देशाचेच आहेत आणि सरकारही देशाचेच आहे. जे काही होईल ते देश, सरकार आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच व्हावे.”
यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर टीका करत, “कॉकरोच जनता पार्टी आणि देशातील युवकांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा काही विरोधी पक्षांनी केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी वापर केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याऐवजी त्यांनी त्यावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला, हे योग्य नाही,” असे मत व्यक्त केले.
नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सायोनी घोष यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.