Delhi-सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर इमरान मसूद यांची टीका; ‘हे अण्णा हजारे पार्ट-2, सर्व काही स्क्रिप्टेड’
नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार इमरान मसूद यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर टीका करत हे आंदोलन “अण्णा हजारे पार्ट-2” असल्याचा दावा केला आहे. तसेच संपूर्ण घडामोड “स्क्रिप्टेड” असल्याचेही त्यांनी म्हटले.
मसूद म्हणाले की, “अण्णा हजारे यांचे आंदोलन जवळपास 12 वर्षे शांत राहिले आणि आता सोनम वांगचुक पुढे आले आहेत. केंद्रीय मंत्र्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान तेथे एकही विद्यार्थी उपस्थित नव्हता. उपस्थित सर्वजण लडाखचे प्रतिनिधी होते आणि सोनम वांगचुक स्वतःची भूमिका मांडत होते.”
त्यांनी पुढे दावा केला की, “2011 मधील अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर जसे ते राष्ट्रीय राजकारणातून अचानक शांत झाले, त्याचप्रमाणे आता सोनम वांगचुकही लवकरच शांत होतील.”
इमरान मसूद यांच्या या वक्तव्यानंतर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली असून, त्यांच्या विधानावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.