मुंबई | प्रतिनिधी
राज्याच्या कारभारावर आणि समाजातील वाढत्या असहिष्णुतेवर भाष्य करत अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सत्तेच्या अहंकारावर परखड शब्दांत टीका केली आहे. “कुठल्याही शासन, प्रशासनामध्ये ‘आमचं कधीही काहीही चुकतच नाही’ ही भावना कुठून येते? श्रेष्ठत्वाच्या या खात्रीचं मूळ नेमकं कशात आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना त्यांनी, “आपण नागरिकदेखील आपापसात असेच वागू लागलो आहोत का? तथाकथित ‘न चुकणाऱ्या’ समूहांचं शिकणं बंद होतं आणि त्यानंतर त्यांचा ऱ्हास अटळ होतो,” असे मत व्यक्त केले.
अतुल कुलकर्णी यांच्या या वक्तव्याची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू असून, शासनाच्या कार्यपद्धतीसोबतच समाजातील संवाद आणि आत्मपरीक्षणाच्या गरजेवरही नव्याने चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
