​हिंजवडीत साडेअकरा लाखांच्या ‘एम.डी.’ अंमली पदार्थासह तीन तस्करांना अटक

​पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – हिंजवडी येथील मुकाईनगर, लक्ष्मी चौक रोडच्या कडेला भैजान मोटर्स गॅरेजसमोर विक्रीसाठी ११ लाख ५५ हजार ५०० रुपये किमतीचा ‘एम.डी.’ (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या तीन तस्करांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ११ जून २०२६ रोजी दुपारी साडेचार वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.
अक्षय प्रदीप धायगुडे (वय ३१) याला अटक केली आहे. तसेच त्‍यांचे साथीदार दयानंद उत्तम धायगुडे (वय ३८) आणि महेश पुनाराम किचड उर्फ बिश्नोई (वय २१, सर्व रा. खंडाळा, जि. सातारा) व इतर दोन पाहिजे असलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई सुभाष राजेंद्र गुरव यांनी हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्यांच्या ताब्यातील चारचाकी गाड्यातून ६१ ग्रॅम ७० मिलीग्रॅम वजनाचा एम.डी. हा अंमली पदार्थ विक्रीसाठी वाहतूक करताना सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून ड्रग्ज, एक चारचाकी आणि तीन मोबाइल जप्त केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *