अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा देत मोठे वक्तव्य केले आहे. जर इराणने आपली हत्या करण्यात यश मिळवले, तर इराणवर यापूर्वी कधीही न झालेल्या तीव्रतेचा लष्करी हल्ला करण्याचे आदेश आपण आधीच दिले असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
‘द न्यूयॉर्क पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, इराण अनेक वर्षांपासून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. “मी बराच काळ त्यांच्या यादीत आहे. त्यामुळे मी आधीच स्पष्ट निर्देश दिले आहेत. माझ्याबाबत काहीही घडल्यास इराणवर त्यांनी कधीही न पाहिलेला जबरदस्त हल्ला केला जाईल,” असे ट्रम्प यांनी सांगितले.
इस्रायलने इराणच्या कथित हत्या कटाबाबत अमेरिकेला गुप्त माहिती दिल्याच्या वृत्तालाही ट्रम्प यांनी फेटाळून लावले. “नाही, इस्रायलकडे अशी कोणतीही माहिती नव्हती,” असे स्पष्ट करत त्यांनी संबंधित दावे नाकारले.
