शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – कारमध्ये लोखंडी कोयता बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १३ जुलै) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केली.
आदित्य बाबासाहेब शेंडगे (वय २२, रा. पिंपळे सौदागर) आणि आनंद गोविंद कांबळे (वय २८, रा. नखातेवस्ती, रहाटणी) या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रमेश ब्राम्हण यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीमध्ये लोखंडी कोयता बाळगला. आरोपींकडे बेकायदेशीर कोयता असल्याची माहिती काळेवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून कोयता जप्त केला. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *