Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

pimpri chinchwad-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती (Waste-to-Energy) प्रकल्पातील बांधकामाधीन इमारतीचा एक भाग अचानक कोसळल्याने 15 ते 20 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

By Sumedh Chapalgaonkar
July 8, 2026 1 Min Read
0

पिंपरी-चिंचवड(pimpri chinchwad)- महानगरपालिकेच्या (PCMC) सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उभारण्यात येत असलेल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती (Waste-to-Energy) प्रकल्पात मोठी दुर्घटना घडली आहे. या प्रकल्पातील बांधकामाधीन इमारतीचा एक भाग अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत 15 ते 20 कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून हयात 3 जण मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस तसेच महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी, क्रेन आणि इतर आवश्यक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ढिगारा हटविण्याचे काम सुरू असून, अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना त्वरित वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिकाही घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, इमारतीचा भाग कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. बांधकामातील तांत्रिक त्रुटी, निकृष्ट दर्जाचे साहित्य किंवा इतर कोणते कारण या दुर्घटनेस कारणीभूत ठरले, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेमुळे प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, परिसरातील नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
बचावकार्य पूर्ण होईपर्यंत अडकलेल्या व्यक्तींची अचूक संख्या आणि जीवितहानीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. प्रशासनाकडून वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, बचाव मोहिमेच्या प्रगतीनुसार अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे. संपूर्ण यंत्रणा सध्या बचाव आणि मदतकार्यात गुंतली असून, दुर्घटनेबाबत पुढील अद्यतनांची प्रतीक्षा आहे.

Tags:

15 to 20 workers were trapped under the debris after a portion of a building under construction at the Pimpri-Chinchwad Municipal Corporation's waste-to-energy project suddenly collapsed.
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

राज्यात वर्षभरात ९०६ लाचखोर जाळ्यात; महसूल आणि पोलिस विभाग भ्रष्टाचारात आघाडीवर

Next

‘मिसिंग लिंक’वरून विरोधकांवर फडणवीसांचा हल्लाबोल; “₹7 हजार कोटी पाण्यात गेले” हा अपप्रचार

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme