Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

टँकरचालकांची मनमानी अन् महापालिकेची दडपशाही; पिंपरी-चिंचवडमधील सोसायटी धारक वाऱ्यावर! पाणी कपात लागू होतात टँकरच्या दरात 50 टक्के वाढ

By Sumedh Chapalgaonkar
June 30, 2026 2 Min Read
0

​पिंपरी-चिंचवड :
शहरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाच, दुसरीकडे पाण्याचे टँकर चालवणाऱ्या युनियनने सर्वसामान्य सोसायटी धारकांची उघड लूट सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने पंधरा टक्के पाणी कपात लागू केल्याने गेल्या चार दिवसांत टँकरच्या दरांमध्ये तब्बल ५० टक्के दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे ऐन पावसाळ्यातही सोसायटी धारकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. एकीकडे पाणी नाही आणि दुसरीकडे टँकरचे गगनाला भिडलेले भाव, अशा दुहेरी कात्रीत नागरिक अडकले आहेत.

​आठशे रुपयांचा टँकर थेट १२-१५०० वर!
​काही दिवसांपूर्वी ज्या टँकरची किंमत प्रति टँकर ८०० रुपये इतकी होती, ती आता टँकर चालकांच्या युनियनने मनमानी निर्णय घेत थेट १२०० ते १५०० रुपयांवर नेऊन ठेवली आहे. पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना पिण्यासाठी देखील पाणी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे नाइलाजास्तव महागडे टँकर विकत घेण्याशिवाय सोसायटी धारकांकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.

‘एका मिनिटात’ पाणी कपातीचा निर्णय, पण नियोजन शून्य!
​पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांचा कोणताही विचार न करता अवघ्या एका मिनिटात १५ टक्के पाणी कपातीचा तुघलकी निर्णय लादला. परंतु, ही कपात केल्यानंतर नागरिकांनी पाणी आणायचे कुठून? यावर ना महापालिका प्रशासनाकडे उत्तर आहे, ना आयुक्तांकडे! शहरातील बोअरवेल्स आणि पाण्याचे इतर स्त्रोत आधीच बंद पडले आहेत, अशा परिस्थितीत सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे काम पालिकेने केले आहे.

बिल्डरांवर मेहेरबानी, करदात्यांवर अन्याय!
​”ज्यावेळी मोठे गृहप्रकल्प (सोसायट्या) उभे राहतात, तेव्हा पाणी योजना पूर्ण होईपर्यंत नागरिकांना पाणी पुरवण्याची लेखी जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांची (बिल्डर्सची) असते. असा करारनामा असतानाही, बिल्डर्सकडून त्याचे उल्लंघन केले जात आहे. मात्र, महापालिका या बिल्डर्सवर कोणतीही कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाही, उलट नागरिकांवर सक्तीने पाणी कपात लादते!”

सोसायट्यांचा संताप; प्रशासनाला धरले धारेवर!
​याच भीषण पाणी टंचाई आणि ओल्या कचऱ्याच्या मुद्द्यावरून महापालिकेत झालेल्या बैठकीत सर्व सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले. पिंपरी-चिंचवडकरांच्या बळावर आणि सोसायट्यांच्या मतांवर ज्यांनी सत्ता मिळवली, ते लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आज नागरिकांच्या मूलभूत हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पाणीच मिळत नसेल, तर महापालिका कोणत्या हक्काने नागरिकांकडून विविध कर वसूल करते, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

​प्रशासनाने तातडीने नवे जलस्त्रोत शोधून पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास, शहरातील सोसायट्यांचा हा संताप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

Pimpri-Chinchwad-ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका; JCB ने केबल तोडल्याने प्राधिकरण परिसर ७ तासांपासून अंधारात!

Next

‘MPSC परीक्षा ऑफलाइनच घ्या; ऑनलाइन पद्धतीत स्क्रीन शेअरिंग, क्लोनिंगचे धोके’ – सतेज पाटील यांची विधानपरिषदेत मागणी

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme