दीड वर्षांच्या चिमुकलीसाठी अग्निशमन दलाचे जवान बनले ‘देवदूत’
संत तुकाराम नगरमधील थरार; खेळाच्या नादात दरवाजा झाला बंद पिंपरी-चिंचवड : काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना पिंपरीतील संत तुकाराम नगर परिसरात घडली. खेळता खेळता दीड वर्षांची चिमुकली एका खोलीत अडकली. दरवाजा आतून लॉक झाला. आई-वडिलांचा जीव टांगणीला लागला. मात्र,…
५६ लाखांची सायबर फसवणूक: सायबर सेलची सातासमुद्रापार ‘धडाकेबाज’ कारवाई भोसरीतील उद्योजकाचे पैसे अमेरिकेतील बँकेतून मिळवले परत
पिंपरी-चिंचवड : भोसरी येथील एका उद्योजकाची ५६ लाख रुपयांची फसवणूक झाली. मात्र, पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत ही सर्व रक्कम तक्रारदाराला परत मिळवून दिली आहे. अमेरिकेतील बँकेशी सातत्याने समन्वय राखून केलेली ही कारवाई सायबर…
कोट्यावधींचा विक्रीकर थकवणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – शासनाचे ५२ कोटी ६५ लाख रुपयांचे विक्रीकर थकवल्याप्रकरणी ‘बिग व्हिजन वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’च्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखली येथे घडली. चंद्रकांत महादेव मोरे आणि एका महिला आरोपी…
चाकण परिसरात गावठी पिस्तुलसह तरुण अटकेत
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – चाकणमधील मेदनकरवाडी परिसरात बेकायदेशीरपणे गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ४ मे) रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास करण्यात आली. नकूल…
चिंचवडमध्ये दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – चिंचवड येथील मदर टेरेसा ब्रिजवर भरधाव वेगातील दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ५ मे) रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली. आदित्य बसलिंगप्पा मेटी (सध्या रा. हडपसर. मूळ…
पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणा-या पवना धरण ३६ टक्क्यांवर मावळ तालुक्यातील धरणांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा
पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने आज सकाळी ८:०० वाजता प्रसिद्ध केलेल्या भीमा खोरे पूरनियंत्रण अहवालानुसार, मावळ तालुक्यातील पवना, आंद्रा, कासारसाई आणि वडिवळे या प्रमुख चार धरणांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. मे…
गुन्हे शाखेकडून नऊ पिस्तूल अन् ४६ काडतुसांसह चौघे जेरबंद देहूरोड गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई; ८ लाखांचा शस्त्रसाठा जप्त
पिंपरी-चिंचवड : देहूरोड येथील व्यापारी खून प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैध शस्त्रधारकांविरुद्ध विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेत गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल ९ देशी बनावटीची पिस्तूलं…
ताथवडे येथे भीषण अपघात; उभ्या ट्रकवर टेम्पो ट्रॅव्हलर आदळली अग्निशमन दलाने पत्रे कापून जखमीला काढले बाहेर; पहाटेच्या सुमारास थरार
पिंपरी-चिंचवड : मुंबई-बेंगलोर महामार्गावर ताथवडे येथे उभ्या असलेल्या ट्रकवर टेम्पो ट्रॅव्हलर पाठीमागून जोरदार आदळली. या भीषण अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी होऊन वाहनातच अडकला होता. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत कौशल्याने या प्रवाशाची…
प्राधिकरणात सोमेश्वर मंदिरासमोर मीटर बॉक्सला आग; अनर्थ टळला अग्निशमन दलाची वेळेत एन्ट्री: ‘ABC’ यंत्राच्या सहाय्याने आगीवर मिळवले नियंत्रण
पिंपरी : निगडी प्राधिकरणातील सेक्टर २५ भागात असलेल्या सोमेश्वर मंदिरासमोर मंगळवारी (दि. ५) सायंकाळी मीटर बॉक्सला अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा पाहून परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाने तत्परता दाखवत ही आग वेळीच विझवली.…
एन्काऊंटरच्या धास्तीने मुख्य सूत्रधार न्यायालयात हजर!
भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी खून प्रकरण : ‘फेक एन्काऊंटर’ची भीती व्यक्त करत आफताब शेखचे शरणागती पिंपरी : भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी खून प्रकरणाला आता मोठी कलाटणी मिळाली आहे. पोलिसांकडून एन्काऊंटर होण्याची भीती वाटल्याने यातील मुख्य संशयित…