हिंजवडीत कारची मोपेडला धडक
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – एका भरधाव स्विफ्ट कार चालकाने मोपेडला जोरदार धडक देऊन गंभीर अपघात केला ही घटना २ जुलै रोजी सकाळी हिंजवडी येथील आयबीआयएस हॉटेलच्या एक्झिट गेटसमोर घडली. स्विफ्ट कार (क्रमांक एम पी १७ सीडी ३३३८) वरील चालकाविरुद्ध गुन्हा…
पार्किंगच्या वादातून तरुणाला मारहाण
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – गाडी पार्क करण्याच्या शुल्लक कारणावरून तीन जणांनी मिळून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि बेल्टने बेदम मारहाण केली. ही घटना ३ जुलै रोजी मध्यरात्री घडली. प्रतीक शिंदे (वय २५), ऋत्विक क्षीरसागर (वय २४) आणि आकाश आडसुळ (वय २५,…
दोन दिवसांत शहरात २७ झाडे कोसळली भोसरी, निगडी, पिंपरी, चिंचवड आणि पिंपळे सौदागर परिसरात सर्वाधिक घटना; अग्निशमन विभागाची धावपळ
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विविध भागांत एकूण २७ झाडे कोसळल्याने अग्निशमन विभागाची चांगलीच धावपळ उडाली. ३ जुलै रोजी…
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतानाही आदेशाचे उल्लंघन करून थेरगाव येथील धनगर बाबा मंदिरासमोर कोयत्यासह फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास…
गावठी कट्ट्यासह एक जण ताब्यात
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका चोवीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई भामचंद्र डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर २ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.…
च-होलीत किरकोळ वादातून हातोडीने वार करून खून
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – किरकोळ भांडणाचा राग मनात धरून एका कामगाराचा डोक्यात हातोडी मारून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द येथील घोलप वस्तीत २ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली आहे. करवीरसींग नथुसिंग…
पवना धरणाला अखेर पावसाची साथ; अवघ्या २४ तासांत पाणीसाठ्यात १.१८ टक्क्यांची वाढ
२४ तासांत ९० मिमी पावसाची दमदार नोंद; तरीही गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा अद्याप खूपच कमी पिंपरी-चिंचवड : शहरासाठी जीवनदायी असलेल्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत दमदार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात दिलासादायक वाढ झाली आहे.…
pimpri chinchwad-नवव्या मजल्यावरून सिमेंट ब्लॉक पडल्याने कामगार जखमी
पिंपरी, दि. ३ (pimpri chinchwad) – बांधकाम साइटवर नवव्या मजल्यावरून सिमेंट ब्लॉक खाली पडल्याने एक कामगार जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ३ जुलै) रोजी सकाळी जाधववाडी येथे घडली. वीरप्पा चिनोल (३९, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे जखमी कामगाराचे नाव आहे.…
पोलिसांनी लावली अडीच कोटींच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट १५६ गुन्ह्यांतील गांजा, एमडी, ब्राऊन शुगर, अफूची झाडे आणि डोडाचा समावेश
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने मोठी आणि निर्णायक कारवाई करत तब्बल २ कोटी ६४ लाख १३ हजार ७१० रुपये किमतीचे विविध प्रकारचे अमली पदार्थ नष्ट केले. शहरातील १५६ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला हा साठा रांजणगाव एमआयडीसी येथील अधिकृत औद्योगिक भट्टीमध्ये…
पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतुकीत बदल
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी निमित्त ४ ते ८ जुलै तर तुकाराम महाराज पालखी निमित्त ५ ते ८ जुलै या…