पुणे :
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ’ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच, अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी प्रशासकीय पातळीवर शांतता पाहायला मिळाली. आज जाहीर झालेल्या अधिकृत माहितीनुसार, पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) दाखल झालेला नाही. त्यामुळे आजअखेर अर्जांची संख्या ‘निरंक’ आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी गजानन पाटील (भा.प्र.सेवा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि. २७ मे) रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंतच्या निर्धारित वेळेत एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नाही.
राजकीय वर्तुळात सध्या जागावाटप आणि उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू असल्याने पहिल्या दिवशी शांतता असल्याचे बोलले जात आहे. येत्या काही दिवसांत प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आपले शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्याची शक्यता असून, या निवडणुकीतील खरी चुरस लवकरच पाहायला मिळेल.
