लाचखोर महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात! 50 हजारांची लाच घेतल्यावर पुन्हा केली होती पैशाची मागणी
पिंपरी-चिंचवड : बावधन पोलीस ठाण्यातील एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाने (API) तक्रारदाराकडून गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करत संबंधित महिला…
भोसरीत पेट्रोल पंपाशेजारील गॅरेजला भीषण आग; दोन दुचाकी जळून खाक अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!
पिंपरी-चिंचवड : भोसरी येथील गव्हाणे पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या एका गॅरेजला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली. ही आग इतकी भयानक होती की त्यात दोन दुचाकींसह गॅरेजमधील साहित्य जळून खाक झाले. मात्र, अग्निशमन दलाने दाखवलेल्या कमालीच्या तत्परतेमुळे ही आग…
धगधगत्या उन्हाने पवना धरण आटतेय बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने पिंपरी-चिंचवडवर जलसंकटाचे सावट
पिंपरी-चिंचवड: मे महिन्याच्या रणरणत्या उन्हामुळे धरणांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असून, पाणीसाठा झपाट्याने खाली जात आहे. शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना धरणात सध्या केवळ ३३.७८ टक्के उपयुक्त साठा शिल्लक असून, वाढत्या उष्णतेमुळे…
पवना नदीचा श्वास पुन्हा गुदमरला! प्रदूषणाचा फेस वर महापालिकेचा पर्यावरण विभाग नेमका करतोय काय?
पिंपरी-चिंचवड: शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना नदीचे अस्तित्व आता पुन्हा धोक्यात आले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या नदीला ‘गटारगंगा’ स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रात प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी…
आळंदी हादरली! घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार संतापजनक कृत्याने पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ
पिंपरी-चिंचवड: आळंदी परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार (Gangrape) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध…
पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार ‘किल्ले’रूपी प्रशासकीय सुरक्षा! १० क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना; ‘राजगड’ ते ‘रायगड’ अशी नवी ओळख
पिंपरी | प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता, महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. विद्यमान ८ प्रभाग समित्यांची पुनर्रचना करून आता १० नवीन क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना करण्यात आली…
नागपूरचा ‘छंद’ आणि सायन्स पार्कची ‘कला’ उन्हाळी सुट्टीत अनुभवा संस्कृतीचा खजिना!
पिंपरी-चिंचवड : येत्या १८ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिना’चे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि नागपूरची ‘छंदसम्राट’ सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कला व संस्कृतीच्या एका विशेष प्रदर्शनाचे…
धुळीचे लोट अन् बिल्डरांचे धाबे दणाणले! पिंपरी-चिंचवड मनपाचा १७९ विकासकांना ‘दणका
पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड शहराला विळखा घालणाऱ्या धुळीच्या साम्राज्याविरोधात महापालिका आयुक्त आणि प्रशासनाने आता ‘बुलडोझर’ उपसाला आहे. बांधकाम स्थळांवर प्रदूषण नियंत्रण नियमांची सर्रास पायमल्ली करणाऱ्या १७९ बड्या बांधकाम व्यावसायिकांना महापालिकेने…
सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या भव्य ‘बोधचिन्हा’चे मुंबईत अनावरण
पुण्याच्या सुमित काटे यांचे डिझाइन अव्वल; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मान मुंबई : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आता अधिकृतरीत्या सुरू झाली आहे. या महाकुंभाच्या…
काळेवाडीत माणुसकीचे दर्शन! दोन तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या आजींची जवानांनी केली सुखरूप सुटका
महिला जवानांनी दिला लेकीचा मायेचा आधार; शर्थीच्या प्रयत्नांनंतर ६५ वर्षीय स्मिता कासारे यांना जीवदान पिंपरी-चिंचवड : काळ आला होता पण वेळ आली नव्हती, याचाच प्रत्यय बुधवारी दुपारी काळेवाडीतील पाचपीर चौक परिसरात आला. रस्त्यालगतच्या एका अरुंद पाईपमध्ये पाय…