Mumbai-आयटी क्षेत्रातील कथित धर्मांतर, मानसिक छळ आणि लैंगिक शोषण प्रकरणांवर विधान परिषदेत चर्चा; विशेष समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : नाशिकमधील टीसीएस आणि पुण्यातील विप्रो कंपनीतील कथित धर्मांतर, मानसिक छळ आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून विधान परिषदेत बुधवारी जोरदार चर्चा झाली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा मुद्दा उपस्थित करत आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील सुशिक्षित महिलांना…
Mumbai-मालाड सबवेची महापौर रितू तावडे यांच्याकडून पाहणी; जलनिस्सारण व्यवस्थेचा घेतला आढावा
मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर महापौर रितू तावडे यांनी आज मालाड सबवे परिसराला प्रत्यक्ष भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाळ्यात सबवेमध्ये पाणी साचून वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी उभारण्यात आलेल्या…
New Delhi –दिल्ली-एनसीआरमध्ये मान्सूनची प्रतीक्षा कायम; अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमधील नागरिक मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असताना, अद्याप दक्षिण-पश्चिम मान्सूनने राष्ट्रीय राजधानीत प्रवेश केलेला नाही. आकाशात ढग दाटून येत असले आणि काही भागांत हलका पाऊस तसेच जोरदार वारे वाहत असले, तरी मान्सूनच्या…
New Delhi-ईरानच्या अणुस्थळांच्या तपासणीवर ट्रम्प यांची कडक भूमिका; शांतता चर्चेवर परिणाम होण्याची शक्यता
नवी दिल्ली : अमेरिका आणि ईरान यांच्यात सुरू असलेल्या शांतता चर्चेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईरानच्या अणुस्थळांच्या तपासणीच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेतली आहे. पेनसिल्व्हेनिया येथे पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी ईरानने…
Mumbai-मुंबईतील रस्ते, मेट्रो कामांवरून संजय राऊत यांची सरकारवर टीका; ‘मुंबईकरांनी प्रवास कसा करावा?’
मुंबई : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांची अवस्था, सुरू असलेली विकासकामे आणि वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “मुंबईतील अनेक…
Dharashiv-ओमराजे निंबाळकरांच्या पक्षांतरावर मकरंदराजे निंबाळकरांची नाराजी; ‘पक्षाचा आदेश मिळाला तर रस्त्यावर उतरेन’
धाराशिव : खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मकरंदराजे निंबाळकर यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. ओमराजे यांनी पक्षांतराबाबत आपल्याशी चर्चा केली होती, मात्र हा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले.…
Mumbai-दादर स्थानक परिसरात कारवर झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली
मुंबई : मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबईतील दादर रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी एक मोठी दुर्घटना घडता घडता टळली. दादरमधील गजबजलेल्या रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारवर मोठे झाड कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या…
Mumbai-महापौर रितू तावडे यांच्या पाहणीदरम्यान पालिका अधिकारी उघड्या मॅनहोलमध्ये पडले; सुदैवाने अनर्थ टळला
मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महापौर रितू तावडे माटुंगा परिसरात भेट देत असताना एक अनपेक्षित घटना घडली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांच्या मागे उभे असलेले बृहन्मुंबई महानगरपालिकेचे एक अधिकारी…
Pimpri-Chinchwad –हिंजवडीत पिस्तूल बाळगणारा तरुण जेरबंद
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – मारुंजी येथील सार्वजनिक रस्त्यावर २३ जून रोजी सायंकाळी पावणेसात वाजता पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. विक्रांत विकास येवले (वय २२, रा.…
Pimpri-Chinchwad – जुन्या वादातून लोखंडी रॉडने मारहाण
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – चिंचवड येथील वाल्हेकरवाडीमध्ये २३ जून रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मुलासोबत असलेल्या जुन्या वादाच्या कारणावरून एका व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण केली. सुनील मारुती लोणी (वय २५, रा. बिजली नगर, चिंचवड) व त्याच्या…