ताथवडे येथे बेकायदेशीरपणे कोयता बाळगणारा तरुण अटकेत
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – पोलीस आयुक्तांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करून घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (२१ जुलै) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस…
बँक खात्याचा गैरवापर करत सायबर फसवणूक; एकावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – सायबर गुन्हेगारांशी संगणमत करून एका महिलेने स्वतःचे बँक खाते बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांसाठी वापरू दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ३ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास हिंजवडी येथे घडली. या प्रकरणात पोलीस…
Pimpri-Chinchwad-मोबाईलच्या अतिवापराने मेंदूवर घाला; ‘स्क्रीन टाइम’ कमी करण्याचा तज्ज्ञांचा इशारा पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणांमध्ये डिजिटल व्यसन वाढले; स्मरणशक्ती, एकाग्रता आणि झोपेवर होत आहेत गंभीर परिणाम
पिंपरी-चिंचवड : हातातील स्मार्टफोन आज प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, त्याच स्मार्टफोनचा अतिरेक आता मेंदूच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत सोशल मीडिया, व्हिडिओ, गेम्स आणि विविध ॲप्सवर घालवला जाणारा वाढता…
Pimpri-Chinchwad-पवना धरण तुडुंब, तरीही पाणीकपात कायम; पिंपरी-चिंचवडकरांचा संताप वाढला! धरणात ८५.७५ टक्के पाणीसाठा, तरी १५ टक्के कपात मागे नाही; पूर्ववत पाणीपुरवठ्याची नागरिकांची जोरदार मागणी
पिंपरी-चिंचवड : पवना धरणात दिवसागणिक पाणीसाठा झपाट्याने वाढत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेने लागू केलेली १५ टक्के पाणीकपात अद्याप कायम असल्याने शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात…
Pimpri-Chinchwad-विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; चार दिवसांत ६९ स्कूल वाहनांवर कारवाई वाहतूक पोलीस-आरटीओची संयुक्त धडक मोहीम; ३.७६ लाखांचा दंड, नियमभंग करणाऱ्यांना इशारा
पिंपरी-चिंचवड : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) संयुक्त धडक मोहीम राबवली. चार दिवस चाललेल्या विशेष तपासणी मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६९…
Pimpri-Chinchwad-१५ ऑगस्टपासून ‘नो सेग्रिगेशन, नो कलेक्शन’ कचरा विलगीकरणाशिवाय घंटागाडी कचरा उचलणार नाही ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा वेगळा करणे बंधनकारक नियमभंग करणाऱ्यांवर महापालिकेचा कठोर बडगा
पिंपरी-चिंचवड : स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टपासून कचऱ्याचे विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांचा आणि व्यावसायिक आस्थापनांचा कचरा महापालिकेच्या घंटागाड्यांमार्फत उचलला जाणार नाही. त्यामुळे…
Pimpri-Chinchwad-मतदार यादी पुनरीक्षणाला मुदतवाढ; ८ ऑगस्टपर्यंत बीएलओंच्या घरपोच भेटी सुरूच अतिवृष्टीमुळे निवडणूक आयोगाचा निर्णय; गणना प्रपत्र भरून सहकार्य करण्याचे पिंपरी-चिंचवडकरांना आवाहन
पिंपरी : मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. राज्यातील अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, आता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) ८…
Pimpri-Chinchwad-मोशीतील विषारी धुरावर महापौरांचा बडगा प्लास्टिक-टायर जाळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश
पिंपरी-चिंचवड : मोशी परिसरात प्लास्टिक, टायर आणि भंगार जाळून होणाऱ्या वाढत्या वायू प्रदूषणाची महापौर रवि लांडगे यांनी गंभीर दखल घेतली आहे. विष्णू ग्रीन्स सहकारी गृहरचना संस्थेतील नागरिकांनी प्रदूषणामुळे आरोग्यावर होत असलेल्या दुष्परिणामांविषयी…
Pimpri-Chinchwad-सायबर फसवणुकीसाठी बँक खात्यांचा गैरवापर उघड! पिंपरी-चिंचवडमध्ये तीन गुन्हे; लाखोंच्या संशयास्पद व्यवहारांचा पर्दाफाश
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – सायबर गुन्हेगारांकडून बँक खात्यांचा वापर करून देशभरातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी, सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्यांत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या प्रकरणात पिंपरी पोलीस ठाण्यात…
Pimpri-Chinchwad -हापूस-केसरनंतर ‘चौसा’ची गोड एन्ट्री! पिंपरी-चिंचवडच्या बाजारात बिहारच्या आंब्याला ग्राहकांची पसंती
आंब्याचा हंगाम आणखी महिनाभर वाढला; ८० ते १०० रुपये किलो घाऊक दर, ‘गोल्डन चौसा’ही लवकरच बाजारात पिंपरी-चिंचवड : हापूस आणि केसर आंब्याचा हंगाम संपत असतानाच आंबाप्रेमींसाठी दिलासादायक बातमी आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या फळबाजारात आता बिहार आणि…