दुचाकीवरून गांजाची तस्करी करणारी तरुणी पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – भोसरी येथील मच्छी मार्केट पीएमटी चौक परिसरात आपल्या दुचाकीवरून गांजाची विक्री व वाहतूक करणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीला पोलिसांनी पकडले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ११ जून) रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास करण्यात…
चला शाळेत…! १५ जूनला महापालिकेच्या शाळांमध्ये उत्सवाचे वातावरण चिमुकल्यांचे औक्षण, पुष्पवर्षाव आणि मोफत पुस्तकांचे वाटप; महापौर, आयुक्तांसह अधिकारी करणार स्वागत
पिंपरी-चिंचवड ः तब्बल दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोमवार, (दि. १५ जून) पासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये पुन्हा एकदा चैतन्य फुलणार आहे. शाळेची घंटा वाजणार आहे. वर्गखोल्या गजबजणार आहेत. मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी रंगणार आहेत.…
गांजा बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – भोसरी एमआयडीसी हद्दीतील मोशी, आदर्श नगर येथील कचरा डेपोजवळ एका नविन बांधकामाच्या भिंतीच्या आडोशाला बेकायदेशीररित्या विक्रीसाठी १० हजार रुपये किमतीचा गांजा बाळगणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.…
अश्लील हावभाव करणाऱ्या महिलांवर कारवाई
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – काळेवाडी येथील जगताप डेअरी चौक ते शिवार गार्डन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुटपाथवर वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करणाऱ्या महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई…
हिंजवडीत साडेअकरा लाखांच्या ‘एम.डी.’ अंमली पदार्थासह तीन तस्करांना अटक
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – हिंजवडी येथील मुकाईनगर, लक्ष्मी चौक रोडच्या कडेला भैजान मोटर्स गॅरेजसमोर विक्रीसाठी ११ लाख ५५ हजार ५०० रुपये किमतीचा ‘एम.डी.’ (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या तीन तस्करांना पोलिसांनी ताब्यात घेतले…
गॅस रिफिलिंग करणाऱ्या दुकानदाराला अटक
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील चिंबळी येथील लोखंडे वस्तीतील एका मोकळ्या पटांगणात घरगुती वापराच्या मोठ्या गॅस सिलेंडरमधून छोट्या व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग करणाऱ्या एका दुकानदाराला पोलिसांनी अटक केली…
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा दणका! आयुक्तालयातील १५ जणांचा शस्त्र परवाना रद्द नव्या शस्त्र परवान्यासाठीचे ६८ अर्ज फेटाळले
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने शस्त्र परवान्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. शस्त्र परवान्यांचा गैरवापर, नियमांचे उल्लंघन तसेच आवश्यक कारणांचा अभाव आढळून आल्याने पोलीस…
’चिमणी पाखरू’ जुगार खेळणाऱ्या दोन महिलांवर पोलिसांची कारवाई
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – थेरगाव येथील डांगे चौकातील सार्वजनिक शौचालयासमोरील फुटपाथवर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ‘चिमणी पाखरू’ नावाचा जुगार खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.…
बंदूक व काडतुसांसह आरोपीला अटक
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – पिंपरी येथील नेहरूनगर परिसरातील दोस्ती बेकरीच्या मागे वाल्मीकी चाळ येथे विनापरवाना एक बारा बोअर बंदूक व ५ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ११ जून) रोजी रात्री साडेदहा…
चिंचवडच्या ‘विवांत फॅमिली थाई स्पा’वर पोलिसांचा छापा
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – चिंचवड येथील जुन्या पुणे-मुंबई हायवेवरील प्रीमियर प्लाझा मॉलमध्ये सुरू असलेल्या ‘विवांत फॅमिली थाई स्पा’ वर पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका…