राम मंदिर ट्रस्टच्या निर्णयांपासून विहिंपने झटकले हात; ‘आमची भूमिका संपली’, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांचे स्पष्ट विधान
नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या निर्णयांवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विश्व हिंदू परिषदेचे (VHP) आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. ट्रस्टने अलीकडे घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची…
पिवळ्या जरीच्या सिल्क साडीत गिरिजा ओक गोडबोलेचा मोहक अंदाज; पारंपरिक सौंदर्याची उठावदार झलक
मुंबई : अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले हिचा पारंपरिक लूक पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. पिवळ्या रंगाच्या जरीच्या सिल्क हँडलूम साडीत तिने साकारलेला मोहक अंदाज चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. बनारसी हातमागावर विणलेली ही साडी भारतीय…
युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियासमोर इंधन संकट; तेल-गॅस क्षेत्रावर वाढता ताण
मॉस्को : युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून रशियासमोर लष्करी आणि आर्थिक अशा दुहेरी आव्हानांचा सामना करण्याची वेळ आली आहे. युक्रेन युद्ध आणि मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान जगातील अनेक देशांना तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा कायम ठेवणाऱ्या रशियालाच आता इंधन…
व्हेनेझुएलातील भीषण भूकंपानंतर मृतांचा आकडा १,४३० वर; हजारो जखमी, शेकडो धक्क्यांनी जनजीवन विस्कळीत
कराकास : व्हेनेझुएलामध्ये बुधवारी झालेल्या तीव्र भूकंपानंतरची परिस्थिती अजूनही गंभीर असून, मृतांचा आकडा १,४३० वर पोहोचला आहे. तर ३,२३८ जण जखमी झाले असून ३,१४२ कुटुंबे या आपत्तीमुळे प्रभावित झाली आहेत. ही माहिती व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष…
चीनच्या वेस्ट लेकमध्ये ‘लहान पाहुण्यांचे’ आगमन; १२ मँडरीन बदकांच्या पिलांनी वेधले पर्यटकांचे लक्ष
हांगझोऊ : चीनच्या पूर्वेकडील हांगझोऊ शहरातील प्रसिद्ध वेस्ट लेक येथे यंदाच्या हंगामातील पहिल्या मँडरीन बदकांच्या १२ पिलांनी रविवारी प्रथमच जलविहार करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ही लहान पिले प्रथमच तलावात उतरली. मऊ, लुसलुशीत…
ठाकरे गटाला मोठा धक्का; सचिन अहिर यांनी शिवबंधन सोडले, शिवसेनेकडून विधान परिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी पक्षाला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. यानंतर त्यांनी…
अमरनाथ गुहेतील नैसर्गिक हिमलिंग वेगाने वितळत आहे; वाढत्या तापमानाचा परिणाम, तरीही यात्रा नियोजित वेळेनुसारच
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेतील नैसर्गिक हिमलिंग यंदा अपेक्षेपेक्षा वेगाने वितळत असल्याने भाविकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. हिमालयीन भागात वाढलेल्या तापमानामुळे आणि कमी झालेल्या हिमवृष्टीमुळे हिमलिंगाचा आकार लक्षणीयरीत्या कमी…
मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक बोगद्यात धावत्या कारवर दगड कोसळला; कारची काच फुटली, सुदैवाने जीवितहानी टळली
लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कनेक्टिंग लिंक बोगद्यात धावत्या कारवर दगड पडल्याने कारची काच फुटून अपघात झाल्याची घटना आज (२९ जून) सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवार,…
एचडीएफसी बँकेच्या अर्धवेळ अध्यक्षपदी राजीव कुमार यांची नियुक्ती; नियामक मंजुरीनंतर निर्णय होणार प्रभावी
मुंबई : देशातील अग्रगण्य खासगी बँक एचडीएफसी बँकने माजी वित्त सचिव राजीव कुमार यांची अर्धवेळ (पार्ट-टाइम) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही नियुक्ती भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), बँकेचे भागधारक आणि इतर संबंधित नियामक संस्थांची…
भारत–मालदीव मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटींना सुरुवात; पहिली फेरी ७ जुलैपर्यंत
नवी दिल्ली : भारत आणि मालदीव यांच्यातील द्विपक्षीय मुक्त व्यापार करारासाठी अधिकृत वाटाघाटींना सोमवारी प्रारंभ झाला. दोन्ही देशांदरम्यान सुरू झालेली ही पहिली फेरी २९ जून ते ७ जुलैदरम्यान आभासी माध्यमातून पार पडणार आहे. भारताच्या वाणिज्य विभागाने याबाबत…