Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

चुकीच्या पैशांना नकार दिला… पण मृत्यूनेच गाठलं!”

By Team News Beez
May 30, 2026 2 Min Read
0

महिन्याला ४० हजारांची ऑफर धुडकावली; आज कुंकू पुसलं, संसार उद्ध्वस्त झाला; फुगेवाडीतील सारिका राठोड यांचा संघर्ष डोळे पाणावणारा

पिंपरी–चिंचवड
दोन महिन्यांपूर्वी घरात एक चर्चा झाली होती. समोर महिन्याला ४० हजार रुपयांची कमाई, राहण्यासाठी घर आणि आर्थिक स्थैर्याचं स्वप्न होतं. पण त्या स्वप्नामागे होता बेकायदेशीर दारूचा धंदा. तेव्हा पत्नी सारिका राठोड यांनी पती विजय यांच्या डोळ्यांत डोळे घालून एकच वाक्य सांगितलं होतं – “आपल्याला चुकीच्या पैशांची श्रीमंती नको… कष्टाची भाकरी खाऊ, पण दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून मिळवलेला पैसा घरात आणू नका.”
विजय यांनी पत्नीच्या शब्दांचा मान राखला. त्यांनी मोहाला नकार दिला. पण नियतीचा क्रूर खेळ असा की, ज्या विषारी दारूच्या धंद्याला त्यांनी तुच्छ मानलं, त्याच विषारी दारूने अखेर त्यांचा जीव घेतला.
आज सारिका राठोड यांच्या कपाळावरील कुंकू पुसलं आहे. घरातील कर्ता पुरुष गेला आहे. या दुर्घटनेत विजय यांच्यासोबत त्यांच्या भावाचाही मृत्यू झाला. तर वृद्ध सासरे मृत्यूशी झुंज देत रुग्णालयात उपचार घेत आहेत. घरात एकाच वेळी तीन-तीन संकटं कोसळली आहेत.
एका बाजूला पतीचा विरह, दुसऱ्या बाजूला आजारी सासूबाईंची जबाबदारी आणि तिसऱ्या बाजूला उद्याच्या उदरनिर्वाहाची चिंता. टीबी, ब्रेन ट्युमर आणि इतर गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या सासूबाईंचा औषधांचा खर्च कसा भागवायचा, घरभाडे कसं भरायचं, उद्या चूल कशी पेटवायची, या प्रश्नांनी सारिका यांची झोप उडाली आहे.
या सगळ्या संकटातही सारिका यांचा स्वाभिमान मात्र ढळलेला नाही. डोळ्यांत अश्रू आहेत, पण हात पसरलेले नाहीत. “आम्हाला मदतीचे पैसे नकोत. आमच्या हाताला काम द्या. आम्ही कष्ट करू, पण जगू सन्मानाने,” अशी त्यांची विनंती आहे.
फुगेवाडीतील विषारी दारूच्या या दुर्घटनेने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केली. पण सारिका राठोड यांची कहाणी या सगळ्यात वेगळी ठरते. कारण त्यांनी गरिबी स्वीकारली, पण चुकीचा पैसा स्वीकारला नाही. त्यांनी तत्त्वांची साथ सोडली नाही. आज त्याच तत्त्वांच्या मोबदल्यात त्यांना आयुष्यभराचं दुःख मिळालं आहे.
विजय राठोड यांच्या मृत्यूने केवळ एका व्यक्तीचा जीव गेलेला नाही, तर प्रामाणिकपणावर विश्वास ठेवणाऱ्या एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. घरात आज शांतता आहे, भिंतींवर आठवणी आहेत आणि डोळ्यांत एकच प्रश्न आहे – “चुकीचा मार्ग नाकारण्याची हीच का शिक्षा?”
फुगेवाडीतील या छोट्याशा घरातून आजही एक आवाज बाहेर पडतोय – मदतीचा नाही, तर जगण्याची संधी मागणारा. आणि कदाचित हीच त्या कुटुंबाची सर्वात मोठी ताकद आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

जगणे तर सोडा, येथे मरणही यातनादायी स्मशानभूमीचा रस्ता बंद असल्याने पत्र्यावरून मृतदेह नेण्याची शोकांतिका

Next

फुगेवाडी विषारी दारू प्रकरणी पुण्यापाठोपाठ, पिंपरी चिंचवड पोलिसांवरहि कारवाईचा बडगा, दोन अधिकाऱ्यांसह चार कर्मचारी निलंबीत

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • *सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*
  • Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

CATEGORIES

  • Uncategorized (441)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • *सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*
  • Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
July 24, 2026

*सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*

Team News Beez

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मंगळवारी उशिरा रात्री आपले उपोषण मागे घेतले....

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

Sumedh Chapalgaonkar

पवनानगर, दि. २४-*पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा* *धरण ९५...

Read More
July 24, 2026
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme