चुलत्याने केली पुतण्याची हत्या
पिंपरी, दि. 2 (प्रतिनिधी) – घरगुती वादातून एका 62 वर्षीय चुलत्याने आपल्याच पुतण्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याची निर्घृण हत्या केली. ही घटना काळेवाडी येथील कृष्णा गार्डन सोसायटीमध्ये 1 जुलै रोजी घडली. गणेश राजेंद्र पाखरे (वय 32) असे खून…
जनतेच्या हक्कासाठी सभागृहात उठवलेला आवाज यशस्वी… ‘अण्णा भाऊ साठे महामंडळ’ अपहार प्रकरणातील दोषींवर अखेर कारवाई!
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मी सभागृहात ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळा’मधील अपहाराबाबत ‘विशेष उल्लेख सूचना क्रमांक १०८’ द्वारे प्रश्न उपस्थित केला होता. महामंडळातील गैरव्यवहार आणि सर्वसामान्यांच्या…
पिंपरी-चिंचवडच्या जलसुरक्षेसाठी ‘पवना बंद जलवाहिनी’ प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करा!- शंकर जगताप
-विधिमंडळात ‘औचित्याच्या मुद्द्या द्वारे’ आग्रही मागणी -प्रकल्पाचा खर्च आता १,७०० कोटींवर; विशेष निधी देण्याची विनंती – शहराचे भविष्यातील संभाव्य पाणीसंकट टाळण्यासाठी प्रकल्प ठरणार गेमचेंजर पिंपरी, २ जुलै (प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड…
पाऊस वाढला… पण पवना धरणातील पाणीसाठा मात्र घटला; शहराच्या पाणीसाठ्याबाबत चिंता कायम
काल सकाळी ६ वाजेपर्यंत २३ मिमी, तर आज सकाळी ६ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ४५ मिमी पावसाची नोंद; तरीही धरणातील साठ्यात ०.११ टक्क्यांची घट पिंपरी-चिंचवड : शहराची प्रमुख जलवाहिनी असलेल्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढत असला, तरी धरणातील पाणीसाठ्यात अपेक्षित…
देहू-आळंदीत वारीचे मंगलमय वातावरण; विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी सज्ज पालखी प्रस्थानाचे वेध लागले; दिंड्यांची तयारी अंतिम टप्प्यात, टाळ-पखवाजांना नवा सूर, तंबूही सज्ज
देहू-आळंदी : आषाढी वारीचे दिवस जवळ येताच देहू आणि आळंदी या संतभूमीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी प्रस्थानाचे वेध संपूर्ण वारकरी संप्रदायाला लागले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून…
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्तांची मोठी फेररचना नव्या नियुक्त्यांनी प्रशासनाला नवी धार आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आदेश
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. शहराच्या आस्थापनेवरील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नियुक्त्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या संदर्भातील अधिकृत आदेश…
तीन लाखांची खंडणी स्वीकारणारा ‘मसना’ जेरबंद गुन्हे शाखेच्या पोलिसांचा फिल्मी स्टाईल ट्रॅप!
पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – “चाकण भागात माझी मोठी दहशत आहे. इथे सिक्युरिटीचा व्यवसाय चालवायचा असेल तर पैसे द्यावेच लागतील, नाहीतर तुला खल्लास करून टाकेन,” अशी धमकी देऊन तीन लाखांची खंडणी स्वीकारणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांच्या…
‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’; आजपासून वारकऱ्यांसाठी ‘चरणसेवा’ उपक्रम सुरू ११ जिल्ह्यांतील ४०० सेवा केंद्रांवर १२ हजारांहून अधिक डॉक्टर व स्वयंसेवक सज्ज मोफत आरोग्यसेवा, फिजिओथेरपी आणि चरणसेवेचा लाभ
मुंबई : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे ‘चरणसेवा’ उपक्रमाला आजपासून प्रारंभ झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून…
पहिल्याच तिमाहीत ५२६ कोटींचा मालमत्ता कर जमा ४.४५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी भरला कर; ऑनलाइन भरण्याकडे नागरिकांचा मोठा कल
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत मालमत्ता कर वसुलीचा नवा विक्रम नोंदविला आहे. अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ५२६ कोटी १४ लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला असून, शहरातील ४ लाख ४५…
Pimpri-Chinchwad-कचरा प्रश्नावर महापालिकेची माघार; सोसायटीधारकांना मोठा दिलासा ओला कचरा उचलणे तूर्तास सुरूच राहणार; अंतिम निर्णय लोकप्रतिनिधींसोबत चर्चेनंतर
पिंपरी-चिंचवड : शहरातील दररोज १०० किलोहून अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या आणि मोठ्या आस्थापनांचा ओला कचरा १ जुलैपासून उचलला जाणार नसल्याच्या महापालिकेच्या निर्णयावर अखेर प्रशासनाने माघार घेतली आहे. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी…