जिल्हा परिषद शाळांच्या यशस्वी मॉडेलचा राज्यभर विस्तार करण्याचे संकेत…शासकीय शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रशासन सज्ज; मंत्री दादाजी भुसे यांचा आढावा

राज्यातील जिल्हा परिषदांच्या अनेक शाळा ज्ञानदानाचे उत्कृष्ट कार्य करीत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन सर्वच शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्याचे आवाहन शालेयशिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आढावा बैठकीत केले. २०२६-२७ हे शैक्षणिक वर्ष सुरू होताना विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करणे तसेच विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी दर्जेदार गणवेश देणे यावरही त्यांनी भर दिला.

शाळा सुरू होण्यापूर्वी परिसर स्वच्छतेचे योग्य नियोजन करावे. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गणवेश दर्जेदार असावे. बालभारतीमार्फत ८० टक्के पुस्तके शाळांपर्यंत पोहोचली असून उर्वरित पुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वी पोहोचतील याची दक्षता घ्यावी, असेही श्री.भुसे यांनी सांगितले.

मंत्रालयात आयोजित या बैठकीस प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *