बॅटरी, स्टेपनी चोरणारे दोघे गजाआड
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – ट्रॅव्हल्स बसमधून ४५ हजार रुपये किमतीची बॅटरी आणि स्टेपनी चोरणाऱ्या दोन चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. ही चोरी १ जुलै रोजी सायंकाळी ४:०० ते साडेपाचच्या दरम्यान भोसरी येथील बाबर पेट्रोल पंपाच्या पाठीमागे घडली.…
लिव्ह-इन पार्टनरवर चाकूने हल्ला; चिमुरडीचे अपहरण
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – एकत्र राहत नसण्याच्या कारणावरून एका तरुणाने त्याच्या लिव्ह-इन पार्टनर महिलांवर चाकूने हल्ला केला. तसेच त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीला पळवून नेले. ही घटना १ जुलै रोजी दुपारी खेड तालुक्यातील आंबेठाण परिसरात घडली आहे.…
पेट्रोल पंपावर २५ लाखांचा अपहार; तिघांवर गुन्हा
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – बँक खात्यात यूपीआयद्वारे पैसे वळवून आणि स्टॉक रजिस्टरमध्ये खोटे हिशोब लिहून २५ लाख रुपयांचा अपहार केला. ही घटना १ एप्रिल २०२५ ते २२ मे २०२५ दरम्यान मावळ तालुक्यातील आंबी येथील आदित्य पेट्रोल पंपावर घडली. याप्रकरणी…
काळेवाडीत घरफोडी प्रकरणी एकास अटक
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – काळेवाडी येथील एम एम चौक परिसरातील एका भोजनालयाचे मागच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोराने गल्ला आणि कपाटातून ६० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना दि. २९ जून रोजी रात्री १०:०० ते ३० जून रोजी सकाळी १०:३० च्या…
‘एफडीए’चा धाक वाढला! पिंपरी-चिंचवडमधील हॉटेलांच्या मेन्यूमधून पनीर-चीजचे पदार्थ गायब
तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा परिणाम; ‘अॅनालॉग चीज वापरत नाही’ असे फलक झळकू लागले, भेसळखोरांमध्ये खळबळ पिंपरी-चिंचवड : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त…
पवना धरण परिसरात मुसळधार; २४ तासांत ८५ मि.मी. पावसाची नोंद पाणीसाठ्यात किरकोळ वाढ!
मावळ : मावळ वासियांसह पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाने अखेर दमदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात तब्बल ८५ मि.मी. इतक्या मुसळधार पावसाची नोंद झाली असून, यामुळे धरणाच्या जलसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. पावसाची…
पिंपरी-चिंचवड आणि मावळवासीयांसाठी दिलासादायक बातमी! पवना धरणातील पाणीसाठ्यात यंदाच्या मोसमात पहिलीच वाढ
मावळ : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर पवना धरण परिसरात दमदार हजेरी लावली आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे यंदाच्या पावसाळी हंगामात पहिल्यांदाच धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या सकारात्मक बदलामुळे मावळ तालुका आणि…