भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात देणे आता बंधनकारक; आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई पुणे ग्रामीण जिल्ह्यासाठी अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे निर्देश; घरमालकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
पुणे, दि. २९ (प्रतिनिधी) : पुणे ग्रामीण जिल्ह्यातील घरमालकांसाठी महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे. घर किंवा सदनिका भाड्याने देताना संबंधित भाडेकरूची संपूर्ण माहिती आता स्थानिक पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न…
खडकीत १० ते १२ ऑगस्टदरम्यान अग्निवीर भरती; तरुणांसाठी भारतीय सैन्यात दाखल होण्याची सुवर्णसंधी बीईजी केंद्रात भरती मेळावा; विविध पदांसाठी शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि नोंदणी होणार
पुणे : भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. खडकी येथील बाँबे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर (बीईजी) येथे युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत १० ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.…
अमली पदार्थ बाळगणार्या तरुणावर गुन्हा
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – गहूंजे गावच्या हद्दीत बेकायदेशीरपणे अमली पदार्थांची विक्री करणार्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई 28 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलीस हवालदार सचिन बबनराव काचोळे…
घरासमोरून 45 हजारांची बुलेट चोरीला
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – घरासमोर पार्क केलेली 45 हजार रुपये किमतीची बुलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही चोरी 22 जून ते 2 जुलै दरम्यानच्या काळात मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे येथे घडली आहे. शहाजी नामदेव वाघमारे (वय 52, रा. अनिकेत कोळेकर चाळ,…
गाडी लावण्यावरून तरुणाला विटेने मारहाण
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – घरासमोर दुचाकी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणावरून शेजार्याने तरुणाला शिवीगाळ करत विटा फेकून मारहाण केली. ही घटना पिंपरी येथे 20 जुलै रोजी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास घडली. पवन पुरुषोत्तम गिडवाणी (वय 22, रा.…
तडीपार गुंडाला लोखंडी कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला कोयत्यासह अटक केली. ही कारवाई 28 जुलै रोजी सायंकाळी जुनी सांगवी येथे करण्यात आली. पोलीस हवालदार शैलेश गुलाब मगर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अक्षय दशरथ…
सायबर टोळीला बँक खाते पुरवून सव्वा कोटींची फसवणूक
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – चाकण हद्दीत बँक खात्याचा गैरवापर करत देशभरातील 7 नागरिकांची एक कोटी 23 लाख 73 हजार 561 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 1 ऑक्टोबर 2025 ते 31 मार्च 2026 दरम्यान घडला. पोलीस शिपाई उमेश बळीराम कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.…
तरुणाच्या बँक खात्यावरून 30 लाखांचे आर्थिक गैरव्यवहार
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – निगडी परिसरामध्ये बँक खात्याद्वारे 30 लाखांहून अधिक रकमेचे संशयास्पद आर्थिक व्यवहार करण्यात आले. ही घटना 14 ते 17 फेब्रुवारी 2026 दरम्यान घडली. पोलीस शिपाई सुमित मारुती मोरे (वय 24) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.…
आरएमसी मिक्सर वाहनांना दिलासा; वाहतूक प्रवेशबंदीत अंशतः शिथिलता २९ जुलैपासून महिनाभर प्रायोगिक अंमलबजावणी; सुरक्षा नियमांचे पालन बंधनकारक
पिंपरी-चिंचवड : शहरातील आरएमसी (रेडी मिक्स काँक्रिट) मिक्सर वाहनांच्या वाहतुकीबाबत पोलीस वाहतूक शाखेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरएमसी असोसिएशनसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रवेशबंदीच्या वेळेत अंशतः शिथिलता देण्यात आली असून, हा निर्णय २९ जुलै २०२६ पासून…