जुन्या वादातून तरुणावर रॉडने जीवघेणा हल्ला

पिंपरीतील भाटनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी (१४ एप्रिल) पहाटे ४:४५ वाजण्याच्या सुमारास भाटनगरमधील गिरजुबाबा मंदिराजवळ घडली.

या प्रकरणात राज महेश कजानिया (२४, निराधार नगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय बाबु पांढरे (२२, भाटनगर, पिंपरी) आणि ऋतिक बाबु पांढरे (१९, भाटनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ऋतिकला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादीच्या मित्राला वारंवार चिडवत असल्याने फिर्यादी त्यांच्या घरच्यांना समजावण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी आणि त्यांचा मित्र विश्वास अशोक शिंदे (२८, निराधारनगर, पिंपरी) यांना ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर प्रहार करून गंभीर जखमी केले. मारहाण केल्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत माजवत पळ काढला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *