चिकनच्या भाजीवरून पोटभरे कडून मारहाण अजंठानगर, चिंचवडमधील धक्कादायक प्रकार; क्षुल्लक कारणावरून डोके फोडले, आरोपीवर गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड ः
“तू दुसऱ्याच्या घरातून चिकनची भाजी का आणली?” या अत्यंत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाला बेल्टने आणि त्याच्या बक्कलने रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अजंठानगर, चिंचवड येथे बुधवारी (दि. १३) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी सागर रंगनाथ पोटभरे (रा. शाहू फुले आंबेडकर हाऊसिंग सोसायटी, अजिंठा नगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या मारहाणीत सुनील तुकाराम घाडगे (वय ३६, रा. अजिंठा नगर) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांनी गुरुवारी (दि. १४ मे) निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोटभरे’वरून वाद! चिकनची भाजी आणली म्हणून तरुणाला बेल्टच्या बक्कलने बेदम मारहाण
आहेत.

‘चिकन’ ठरले वादाचे कारण!
​निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील घाडगे आणि आरोपी सागर पोटभरे हे एकाच परिसरात राहतात. बुधवारी रात्री सुनील यांनी दुसऱ्याच्या घरातून चिकनची भाजी आणली होती. हे पाहून आरोपी सागर पोटभरे याचा जणू तिळपापड झाला. त्याने सुनील यांना गाठून, “तू दुसऱ्याच्या घरून चिकनची भाजी का आणली?” अशी थेट विचारणा केली. ​सुनील काही समजण्याच्या आतच आरोपीने त्यांना घाणेरडी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता या किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले.

बेल्टच्या बक्कलने केला थेट डोक्यावर वार
​राग अनावर झाल्याने आरोपी सागर याने घरातून चामडी बेल्ट आणला आणि तो सुनील यांच्यावर उपसला. बेल्टने बेदम मारहाण करत असताना, बेल्टचे लोखंडी बक्कल सुनील घाडगे यांच्या डोक्यात अतिशय जोरात बसले. हा वार इतका जबर होता की, सुनील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्ताची धार लागली.

परिसरात जोरदार चर्चा
​रक्तबंबाळ झालेल्या सुनील यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले असून, त्यांच्या फिर्यादीवरून निगडी पोलिसांनी आरोपी सागर पोटभरे याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. चिकनच्या भाजीवरून घडलेल्या या ‘पोटभरे’ मारहाणीची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *