कोणत्याही दोरखंडा शिवाय सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाला आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली आहे.महाराष्ट्राच्या गिर्यारोहण क्षेत्रात एका नव्या अध्यायाची नोंद झाली आहे. आंबेवाडी गावचे रहिवासी आणि ‘महाराष्ट्र रेंजर्स’ संस्थेचे गिर्यारोहक तानाजी केकरे यांनी आपल्या अद्भूत कौशल्याच्या जोरावर दोन मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तानाजी यांनी सह्याद्रीतील सर्वात कठीण मानले जाणारे टप्पे विक्रमी वेळेत पार केले.त्यांनी नुकताच सिंहगडाचा ऐतिहासिक आणि थरारक ‘तानाजी कडा’ कोणत्याही दोरखंड अथवा तांत्रिक उपकरणांशिवाय अवघ्या साडेनऊ मिनिटांत सर करून क्रीडा जगताला अचंबित केले आहे. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असलेल्या कळसूबाई शिखरावरही विक्रमी चढाई केली होती.विनादोर चढाई अन अंगावर काटा आणणारा थरार ड्रोन च्या माध्यमातून पाहुयात
सिंहगडाच्या पश्चिम बाजूला असलेला ‘तानाजी कडा’ हा अत्यंत सरळ आणि छाती दडपून टाकणारा आहे. इ.स. १६७० मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी याच कड्यावरून चढाई करून गड जिंकला होता.
