Pimpri-Chinchwad-जुन्या भांडणातून एकावर खुनी हल्ला
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – चिंचवडमधील भिमनगर येथे जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना २२ जून रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास चेतना बारसमोर घडली. महेश ऊर्फ भैय्या विलास इंगवले…
महापालिकेत ‘नगरसेवक’ कोण? निवडून आलेल्या महिला की त्यांचे पतीराज? महिला आरक्षणाच्या उद्देशालाच हरताळ; प्रभागापासून स्थायी समितीपर्यंत ‘कारभारी’ संस्कृतीवर नागरिकांचा सवाल
पिंपरी-चिंचवड | महिला सक्षमीकरणासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी नगरसेवक पदांमध्ये ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकारणात अनेक ठिकाणी याच्या नेमक्या उलट चित्र पाहायला मिळत असल्याची…
पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार जोरात! हातगाड्यांवर घरगुती टाक्यांचा सुळसुळाट; ‘कमर्शियल’चे दर परवडेनात, सामान्य ग्राहकांना मात्र प्रतीक्षा
पिंपरी-चिंचवड : उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि परिसरात गॅस सिलिंडरचा मोठा काळाबाजार सुरू असल्याचे समोर येत आहे. शहरातील गॅस कनेक्शन धारकांच्या नावावर परस्पर बुकिंग केले जात आहे. हे सिलिंडर जादा दराने हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांना…
राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा भव्य मेळावा: कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अध्यक्ष कामगारनेते यशवंतभाऊ भोसले कंबर कसून मैदानात!
पिंपरी-चिंचवड (दि. २२ जून २०२६): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील संघटनेच्या सभासद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, आज पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे ‘राष्ट्रीय श्रमिक आघाडी’च्या…
कासारवाडी मेट्रो स्टेशनसमोर शिवाई बसचा भीषण अपघात; चौघे जखमी, एक गंभीर; दुचाकींचेही मोठे नुकसान
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – मुंबई-पुणे महामार्गावर कासारवाडी मेट्रो स्टेशनसमोर सोमवारी दुपारी भरधाव शिवाई बसने पुलाखाली थांबलेल्या दुचाकींना धडक दिली. पावसापासून बचाव करण्यासाठी आश्रय घेतलेल्या नागरिकांना बसने चिरडल्याने झालेल्या अपघातात चौघेजण…
अवैध दारू विक्री करणाऱ्या तरुणाला अटक
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे आणि विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. २० जून) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास, वराळे गावच्या…
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – पोलिसांनी दोन वर्षांसाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या आरोपीला कोयत्यासह अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. २० जून) रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास, चिखली येथील भीमशक्तीनगरमध्ये करण्यात आली. गुन्हे शाखा…
गॅस रिफिलिंग प्रकरणी एकाला अटक
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – गॅस चोरी करणा-या एकास पोलिसांनी पकडले. ही कारवाई शनिवारी (दि. २० जून) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास, सावरदरी येथील मोरया गॅस सर्विसेसमध्ये करण्यात आली. पवन महादेव सातपुते (वय २१, रा. सावरदरी, ता. खेड) या आरोपीला अटक…
दुचाकी सिमेंटच्या कठड्याला धडक; चालकासह दोघांचा मृत्यू
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या कठड्याला धडकली. या अपघातात दुचाकीस्वार स्वतःचा आणि मागे बसलेल्या मित्राचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. २१ जून) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास, हिंजवडी फेज ३ येथील…
नोकरीचे आमिष दाखवून पावणे दोन लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – लिंक्डइन सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून एका तरुणाशी संपर्क साधून नामवंत कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत पावणेदोन लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १९ ते ३० नोव्हेंबर २०२५ या दरम्यान सांगवी येथे घडली.…