मधमाश्यांचा गजर; जुन्नर ते मुळशीपर्यंत शेती संकटाच्या उंबरठ्यावर!
रासायनिक फवारण्या, रेडिएशन आणि जंगलतोडीचा फटका; सहा तालुक्यांत मधमाश्यांची संख्या घटली ‘परागीकरण’ धोक्यात; फळे, भाजीपाला आणि नगदी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती पुणे : शेतीचा अदृश्य आधार मानल्या जाणाऱ्या मधमाश्यांवर मोठे संकट ओढावले आहे.…
“फेरफारासाठी लाखोंची लाच”; माणचा तलाठी ACBच्या जाळ्यात!
₹१.२५ लाखांच्या लाचेचा सौदा; उर्वरित ₹२५ हजार स्वीकारताना संतोष राणे रंगेहात अटकेत महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा उघड; पुणे ACBची मुळशीत धडाकेबाज कारवाई हिंजवडी : वडिलोपार्जित जमिनीवरील फेरफार नोंदीसाठी तब्बल एक लाख पंचवीस हजार रुपयांची लाच मागून…
२० मे रोजी औषध दुकाने बंद; पुणेकरांनी औषधांचा साठा करून ठेवा
राज्यव्यापी बंदची हाक; रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन सतर्क, आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाईन जाहीर पुणे : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने २० मे २०२६ रोजी राज्यव्यापी बंदची घोषणा केल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता…
नसरापूर बालिका अत्याचार-खून प्रकरणाची २१ मेपासून सुनावणी अवघ्या १४ दिवसांत ११०० पानांचे दोषारोपपत्र; विशेष न्यायालयात रोजची सुनावणी होणार
पुणे : संपूर्ण राज्य हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचार आणि खून प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेला आता वेग आला आहे. या संवेदनशील खटल्याची सुनावणी २१ मे २०२६ पासून विशेष न्यायालयात सुरू होणार असून, पुणे ग्रामीण पोलीसांनी अवघ्या…
pune-पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिरदे डॅम येथे फिरण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन मित्रमंडळींपैकी दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिरदे डॅम येथे फिरण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन मित्रमंडळींपैकी दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (17 मे) घडली. करण ज्ञानादेव ढोबरे (वय 20, रा. बालाजीविहार, कोडोली, सातारा) आणि आर्या सुशांत…
नसरापूर अत्याचार प्रकरणात ११०० पानी आरोपपत्र; पंधरा दिवसांत पोलिसांची कारवाई
पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या पंधरा दिवसांत ११०० पानी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले आहे. आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याच्याविरुद्ध पोलिसांनी भक्कम…
पुणे:प्राचार्यांना ‘पोक्सो’ची भीती दाखवून ७ लाखांची खंडणी; बडतर्फ PSI सह दोघे अटकेत,‘रील स्टार’ महिला पोलिस फरार..
पुणे:एका नामांकित महाविद्यालयाच्या ५५ वर्षीय प्राचार्यांना ‘पोक्सो’ (POCSO) आणि विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन ७ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) दोघांना गुन्हे शाखेने अखेर अटक केली आहे. गुन्हे शाखा…
जनगणना प्रशिक्षणास गैरहजर ७ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे, दि. १५ : भारत शासनाच्या जनगणना २०२७ कार्यक्रमांतर्गत फुरसुंगी-उरूळी देवाची नगर परिषद क्षेत्रात जनगणना कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वॉलनट स्कूल, फुरसुंगी येथील ७ शिक्षक व सपोर्ट स्टाफ सदस्यांनी प्रशिक्षणास गैरहजर राहून जनगणना कामकाज करण्यास…
पुणे : हडपसर बॉम्बप्रकरणी शिवाजी राठोड नागपूरातून गजाआड, महाराष्ट्र एटीएसची कारवाई
पुणे : हडपसर येथील ‘उषा किरण’ रुग्णालयात टायमर बॉम्ब आढळल्याच्या घटनेमुळे गुरुवारी शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील संशयित आरोपीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली असून नागपूर रेल्वे स्थानकावरून त्याला ताब्यात घेण्यात आले.…
महापारेषणच्या अतिउच्चदाब वाहिनीत बिघाड झाल्याने हडपसर, मुंढवा, वानवडीचा वीजपुरवठा विस्कळीत
नांदेडसिटी, पर्वती, कोथरुड, बाणेर, औंध भागालाही बसला फटका पुणे, दि. १४ मे, २०२६ : महापारेषण कंपनीच्या थेऊर ते मगरपट्टा या २२० केव्ही अतिउच्चदाब वाहिनीत आज (दि. १४) दुपारी १.२० च्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने हडपसर, मुंढवा, कॅम्प व वानवडीसह परिसरातील…