संपूर्ण पिंपरिचिंचवड शहराला ,तसेच मावळ परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 25 मे च्या सकाळपर्यंत 27% पाणी साठा शिल्लक असून एकीकडे अल निनो चा प्रभाव तर दुसरीकडे कडक उन्हामुळे झपाट्याने कमी होणारी पाणी पातळी लक्षात घेता प्रशासना कडून, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे, यंदा गतवर्षीपेक्षा दोन टक्के साठा जास्त असल्याने धरण विभागाकडून उपलब्ध पाण्याचे 30 जून पर्यंत नियोजन करण्यात आले होते,मात्र अल निनो चा प्रभाव पाहता, 15 ऑगस्ट पर्यंतचे नियोजन करण्याच्या सूचना धरण विभागाला देण्यात आल्या आहेत, पिंपरी चिंचवड शहर तसेच संपूर्ण मावळ परिसर हा पिण्याच्या पाण्याबरोबरच , शेती आणि उद्योगधंद्यांसाठी हि पवना धरणावर अवलंबून आहे, त्यामळे उन्हाची तीव्रता वाढल्यास आणि पावसाला लांबल्यास, जलसाठ्यात घट होऊ शकते ,त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन पवना धरण विभागाचे अभियंता रजनीश बा यांनी केले आहे
पवना धरणात 27% पाणी साठा शिल्लक ,प्रशासनाकडून पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन
