हॉटेलच्या गाळ्यात विनापरवाना दारू विक्री, दोन नोकरांसह मालकांवर गुन्हे
एका हॉटेलच्या गाळ्यामध्ये बेकायदेशीरपणे आणि विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या दोन नोकरांना पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार (५ जून) रात्री ९ वाजता साईप्रसाद हॉटेल, गणेशनगर, तळवडे रोड येथे करण्यात आली. सुदीपकुमार…
तळेगाव एमआयडीसी परिसरात जुगार अड्ड्यावर छापा
एमआयडीसी रोडवर जलशुद्धीकरण केंद्राच्या समोर झाडाच्या खाली बेकायदेशीरपणे तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी (६ जून) दुपारी १२ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास नवलाख उंब्रे गावच्या हद्दीत करण्यात आली. भीमराव तुकाराम…
पावसाचा जोर वाढणार; पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
पुढील पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार सरींची शक्यता; विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट पिंपरी-चिंचवड : मान्सूनपूर्व पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली असून पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर कायम…
शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांचा मोठा घाव; ५ टोळ्यांतील ४५ सराईतांवर मकोकाची कारवाई
आयुक्त विनय कुमार चौबे यांचा संघटित गुन्हेगारीविरोधात निर्णायक बडगा; देहूरोड, काळेवाडी, म्हाळुंगे आणि चिखलीतील टोळ्यांना जबर दणका पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात दहशत माजवून खंडणी, मारामाऱ्या, दरोडे, अंमली पदार्थांची विक्री आणि बेकायदेशीर…
स्पाच्या आड सुरू होता अनैतिक व्यवसाय; वाकडमध्ये पोलिसांचा छापा, दोन महिलांची सुटका
मानव तस्करी विरोधी कक्षाची धडक कारवाई; स्पा चालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा, शहरभर सुरू कडक मोहीम पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे.…
अकरा वीजजोडण्यांसाठी दोन लाखांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात वीजमीटर मंजुरीच्या नावाखाली पैशांची मागणी; देहूगावात लाच स्वीकारताना रंगेहात कारवाई
पिंपरी–चिंचवड : सामान्य नागरिकांना वीजजोडणी मिळवून देण्यासाठी सरकारी यंत्रणेतील काही कर्मचारी अजूनही लाचेचा मार्ग अवलंबत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. येलवडी येथील ११ प्लॉटधारकांच्या नवीन वीजमीटर जोडण्यांची कामे करून देण्याच्या मोबदल्यात तब्बल दोन लाख…
चिखलीत उघड्यावर बायो-मेडिकल वेस्ट टाकणाऱ्यांना दणका; पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ३५ हजारांचा दंड!
पिंपरी-चिंचवड : उघड्यावर जैववैद्यकीय (बायो-मेडिकल) कचरा टाकून पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील चिखली येथे उघड्यावर धोकादायक कचरा…
माणुसकीला काळिमा! अपघातातील जखमीला उपचाराऐवजी गाडीत टाकले, थेट शिक्रापूर हद्दीत मृतदेह फेकला; ४८ तासांत आरोपी अटकेत
पिंपरी-चिंचवड : अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात नेऊन उपचार करण्याऐवजी, त्याचा मृत्यू ओढवू शकतो हे माहीत असतानाही त्याला गाडीत टाकून पळ काढणाऱ्या आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह थेट शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकून देणाऱ्या निर्दयी…
कुदळवाडीत ३६ हजारांचा गुटखा जप्त
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधी तंबाखू आणि गुटखा अवैधरित्या विकणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई ४ जून रोजी रात्री ९:३३ वाजता कुदळवाडीतील विसावा चौका शेजारील रॉयल फॉर्म वॉशिंग सेंटरजवळ…
पेन्शन कार्डच्या बहाण्याने वृद्धाची ९ लाखांची फसवणूक!
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – फेसबुकवर ‘सीनियर सिटीझन्स पेन्शन कार्ड’ची खोटी माहिती देऊन एका ज्येष्ठ नागरिकाची ९ लाख १६ हजार ९०० रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. हा प्रकार ४ जून रोजी दुपारी ३:३० ते रात्री ८:१० दरम्यान स्वप्ननगरी सोसायटी,…