पावसाळ्यात शहरात पाणी साचले तर अधिकाऱ्यांची खैर नाही! – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीं नदी व नालेपात्रातील अतिक्रमणांवर हातोडा मारण्याचे आदेश!
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – आगामी पावसाळ्यात पिंपरी-चिंचवडकरांना पुराच्या पाण्यात अडकवून ठेवणाऱ्या निष्काळजी अधिकाऱ्यांना आणि नदी-नाल्यांचा गळा घोटणाऱ्या अतिक्रमणधारकांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी थेट इशारा दिला आहे. पावसाळा…
महावितरणची दादागिरी! ‘४८ तासांत स्मार्ट मीटर बसवा नाहीतर… मीटर बदलण्याच्या संदेशावर प्रश्नचिन्ह; ‘सहमतीऐवजी सक्तीचा मार्ग का?’ असा नागरिकांचा सवाल
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला वेग देत असताना महावितरणने ग्राहकांना पाठविलेल्या ‘४८ तासांच्या’ संदेशामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. जुने वीजमीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याबाबत पाठविण्यात आलेल्या संदेशांमुळे अनेक…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्स आणि स्लोव्हाकिया दौरा; जी-7 शिखर परिषदेत महत्त्वपूर्ण सहभाग
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच फ्रान्स आणि स्लोव्हाकिया या दोन युरोपीय देशांच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यादरम्यान ते प्रतिष्ठित जी-7 शिखर परिषदेतही सहभागी होणार आहेत. या दौऱ्याला आंतरराष्ट्रीय राजनैतिक दृष्टिकोनातून अत्यंत…
वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या महिलेवर गुन्हा
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे येथील जुन्या पुणे-मुंबई हायवे रोडलगत सीआरपीएफ गेट नंबर ३ समोरील वडाच्या झाडाखाली सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई…
दुचाकीवरून गांजाची तस्करी करणारी तरुणी पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – भोसरी येथील मच्छी मार्केट पीएमटी चौक परिसरात आपल्या दुचाकीवरून गांजाची विक्री व वाहतूक करणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीला पोलिसांनी पकडले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ११ जून) रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास करण्यात…
चला शाळेत…! १५ जूनला महापालिकेच्या शाळांमध्ये उत्सवाचे वातावरण चिमुकल्यांचे औक्षण, पुष्पवर्षाव आणि मोफत पुस्तकांचे वाटप; महापौर, आयुक्तांसह अधिकारी करणार स्वागत
पिंपरी-चिंचवड ः तब्बल दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोमवार, (दि. १५ जून) पासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये पुन्हा एकदा चैतन्य फुलणार आहे. शाळेची घंटा वाजणार आहे. वर्गखोल्या गजबजणार आहेत. मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी रंगणार आहेत.…
गांजा बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – भोसरी एमआयडीसी हद्दीतील मोशी, आदर्श नगर येथील कचरा डेपोजवळ एका नविन बांधकामाच्या भिंतीच्या आडोशाला बेकायदेशीररित्या विक्रीसाठी १० हजार रुपये किमतीचा गांजा बाळगणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.…
अश्लील हावभाव करणाऱ्या महिलांवर कारवाई
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – काळेवाडी येथील जगताप डेअरी चौक ते शिवार गार्डन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुटपाथवर वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करणाऱ्या महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई…
हिंजवडीत साडेअकरा लाखांच्या ‘एम.डी.’ अंमली पदार्थासह तीन तस्करांना अटक
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – हिंजवडी येथील मुकाईनगर, लक्ष्मी चौक रोडच्या कडेला भैजान मोटर्स गॅरेजसमोर विक्रीसाठी ११ लाख ५५ हजार ५०० रुपये किमतीचा ‘एम.डी.’ (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या तीन तस्करांना पोलिसांनी ताब्यात घेतले…
गॅस रिफिलिंग करणाऱ्या दुकानदाराला अटक
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील चिंबळी येथील लोखंडे वस्तीतील एका मोकळ्या पटांगणात घरगुती वापराच्या मोठ्या गॅस सिलेंडरमधून छोट्या व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग करणाऱ्या एका दुकानदाराला पोलिसांनी अटक केली…