चिखलीत पत्त्यांचा जुगार खेळणारे ७ जण ताब्यात
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – चिखली परिसरात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे पैशावर तीन पत्ती नावाचा जुगार खेळणाऱ्या ७ जणांच्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (१८ जून) दुपारी ४.३०…
तळेगाव दाभाडेत जुन्या हायवेवर जाहीर वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेवर कारवाई
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – जुना पुणे-मुंबई हायवेवर वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई गुरुवारी (१८ जून) सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास…
देहूरोड मध्ये गावठी पिस्तूल बाळगणारा तरुण अटकेत
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – गुन्हा करण्याच्या उद्देशाने किंवा परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी स्वतःजवळ विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका आरोपीला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (१८ जून) रात्री…
आजपासून १५ टक्के पाणीकपात; पिंपरी-चिंचवडकरांनो, प्रत्येक थेंब जपून वापरा! पवना धरणात केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक; मान्सूनच्या विलंबामुळे महापालिकेचा कठोर निर्णय
पिंपरी : (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यात आजपासून १५ टक्के कपात करण्यात आली आहे. पवना धरणातील पाणीसाठा धोकादायक पातळीवर पोहोचल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या धरणात केवळ १९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक…
pimpri chinchwad-फुगेवाडी दारूकांडातील १९ बळींच्या चौकशीसाठी आमदार शंकर जगताप यांची ‘लक्षवेधी’ !
पिंपरी १९ जून(pimpri) : फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे बनावट व विषारी हातभट्टी दारू सेवनामुळे तब्बल १९ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत गंभीर घटना घडली होती . या भीषण दुर्घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात उमटणार आहेत. चिंचवड…
Delhi-मान्सूनपूर्व डेंग्यू-मलेरियाविरोधातील तयारीचा आढावा; केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे राज्यांना निर्देश
नवी दिल्ली : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू आणि मलेरियासारख्या डासजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी देशातील तयारीचा आढावा घेतला. यावेळी राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश आणि आरोग्य संस्थांना…
Mumbai-अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण अनिवार्य; १५ ऑगस्टनंतर प्रमाणपत्र नसल्यास कारवाई
मुंबई(mumbai) : राज्यातील अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे आणि प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ व्हावा यासाठी परिवहन विभागाने महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. १ जून ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सर्व अमराठी रिक्षा-टॅक्सी…
Mumbai-आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंत्रालयात योग प्रात्यक्षिके; ‘रबर गर्ल ऑफ इंडिया’ अन्वी झांझरूकियाने जिंकली मने
मुंबई : १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामान्य प्रशासन विभागातर्फे मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात विशेष योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित आणि ‘रबर गर्ल ऑफ इंडिया’ म्हणून…
Omkareshwar-जागतिक सिकल सेल दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती;
ओंकारेश्वर(omkareshwar) : जागतिक सिकल सेल दिनानिमित्त मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी देशभरात सिकल सेल आजाराच्या प्रतिबंध आणि निदानासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेचे कौतुक…
वाकडमध्ये फूड डिलिव्हरी बॉय दीड लाखांच्या एमडी ड्रग्ससह गजाआड
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – ऑनलाइन फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या एका तरुणाला वाकड परिसरात दीड लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे एमडी (मॅफेड्रॉन) पावडर विकताना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (१८ जून) रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास श्री साई…