अनिल मोरे खून प्रकरण: ४ जणांना अटक मुख्य सूत्रधार मात्र अद्यापही फरार
पिंपरी-चिंचवड : मोशी टोलनाक्याजवळील हॉटेल युवराज गार्डन येथे झालेल्या अनिल मारुती मोरे उर्फ मोरे यांच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात एमआयडीसी भोसरी पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या खुनाचा मुख्य सूत्रधार…
आयशरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – भरधाव आयशर ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना नाशिक-पुणे हायवेवर चिंबळी फाट्याजवळ सोमवारी (दि. २५ मे) रोजी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली.…
कन्स्ट्रक्शन साइटवरून १ लाख रुपयांची वायर चोरीला
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – एका कन्स्ट्रक्शन साइटच्या साहित्याच्या खोलीतून एक लाख ३ हजार ८०१ रुपये किमतीचे वायरचे बंडल चोरून नेले. याप्रकरणी कामावरील एका कामगाराला अटक केली आहे. ही घटना ४ मे ते ११ मे या कालावधीत आदर्शनगर, देहूरोड येथे घडली.…
‘सुविधा स्पा’वर पोलिसांचा छापा; तिघा महिलांची सुटका
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – एका स्पामध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करून पोलिसांनी तिघा महिलांची सुटका केली. ही कारवाई सोमवारी (दि. २५ मे) रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास रहाटणी येथील काळेवाडी-रहाटणी रोडवरील ‘सुविधा…
पानटपरीतून ३७ हजारांचा गांजा जप्त
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – एका पानटपरीत विक्रीसाठी ठेवलेला ३७ हजार ५५० रुपये किमतीचा ७५१ ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका ६० वर्षीय वृद्धाला अटक केली आहे. ही कारवाई खेड तालुक्यातील महाळुंगे येथे मंगळवारी (दि. २६ मे)…
संघर्ष, जिद्द आणि परिश्रमातून मिळविले डॉक्टरेटचे स्वप्न
प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून तसेच कौटुंबिक जबाबदारी व सामाजिक व पर्यावरणीय बांधिलकी जपत श्री. बाबासाहेब लक्ष्मण काळे यांनी आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अखेर पीएच.डी. (डॉक्टरेट) पदवी संपादन करून…
महात्मा फुले नगरात इलेक्ट्रिक पॅनल बोर्डाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
पिंपरी-चिंचवड: महात्मा फुले नगर परिसरातील लक्ष्मीनारायण सोसायटीमध्ये आज सकाळी अचानक इलेक्ट्रिक पॅनल बोर्डाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत सोसायटीचे मीटर बॉक्स जळून खाक झाले असले, तरी अग्निशमन दलाने दाखवलेल्या कमालीच्या तत्परतेमुळे आग वेळीच…
जनगणनेच्या कामावर निघालेल्या शिक्षिकेचा दुर्दैवी अंत; कान्हे फाट्यावर कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू
मंचर परिसरात शोककळा; शासकीय कर्तव्य बजावताना काळाने घातला घाला मावळ – जनगणनेच्या शासकीय कामासाठी घराबाहेर पडलेल्या एका शिक्षिकेचा भरधाव कंटेनरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कान्हे फाटा येथे घडली. या भीषण अपघातात शिक्षिका…
रक्षक चौक भुयारी मार्ग अंतिम टप्प्यात; वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू
कोंडीमुक्त प्रवासासाठी महापालिकेची तयारी; वाहनचालकांना वेगमर्यादा पाळण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड : सांगवी फाटा ते किवळे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा रक्षक चौक येथील भुयारी मार्ग आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. काम…
इंग्रजी शाळांच्या झगमगाटात जिल्हा परिषद शाळा पडल्या मागे; पटसंख्येसाठी गुरुजींची गावोगावी धावपळ
मावळ, खेड, भोर आणि मुळशीत मराठी शाळांसमोर अस्तित्वाचे संकट; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची उन्हातान्हात घरभेट मोहीम पुणे – ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचे चित्र झपाट्याने बदलत आहे. खासगी इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे मावळ, खेड, भोर आणि…