pimpri chinchwad-तळेगाव दाभाडे येथे मधमाशांच्या हल्ल्यात महिला जखमी
तळेगाव दाभाडे येथील तुकाराम नगर येथे एका महिलेवर तिच्या घराजवळ असलेल्या मधमाशांच्या पोळ्यावरील माशांनी अचानक हल्ला केला. त्यात महिलेच्या चेहऱ्यावर माशा चावल्याने महिला जखमी झाली आहे, घटनेची माहिती मिळताच तळेगाव येथील वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश…
दोन दिवसांच्या शोधानंतर वलवण धरणात यशचा मृतदेह सापडला
गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण लोणावळ्याचे लक्ष लागून राहिलेल्या यश धनोरीया (वय १२) या शाळकरी मुलाच्या शोधमोहिमेचा अखेर अत्यंत हृदयद्रावक शेवट झाला. वलवण धरणाच्या संथ पाण्यात यशचा मृतदेह मिळून आल्याने, ‘तो सुखरूप परत येईल’ ही आशा आता कायमची मावळली आहे.…
दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनासाठी पिंपरी पालिकेचा मास्टरप्लॅन; ‘मिशन संधी आरंभ’चा उद्यापासून श्रीगणेशा!
कॉर्पोरेट कंपन्यांसोबत उभी राहणार शाश्वत रोजगार परिसंस्था; वाकडमध्ये रंगणार वैचारिक मंथन पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांग बांधवांना सन्मानाने जगता यावे आणि त्यांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, यासाठी महानगरपालिका आणि दिव्यांग भवन…
नागरिकांनो नोंद घ्या! पोलीस आयुक्तांच्या भेटीच्या वेळेत बदल उद्यापासून दर सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत मांडता येणार गाऱ्हाणी
पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या “पोलीस आयुक्तांची भेट” या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या वेळेत अंशतः बदल करण्यात आला आहे. आता नागरिकांना आपल्या तक्रारी आणि समस्या मांडण्यासाठी दर सोमवारी…
गच्च्यांवर रंगली वाळवणाची धामधूम; उन्हाळ्यात घराघरांत पारंपरिक चवींचा सुगंध महिलांची लगबग वाढली; ‘होममेड’ पदार्थांना सोशल मीडियावरून मोठी मागणी
पिंपरी-चिंचवड – उन्हाळ्याचा कडाका वाढताच शहरातील गच्च्या पुन्हा एकदा जिवंत झाल्या आहेत. घराघरांत वाळवणाची लगबग सुरू झाली आहे. पांढऱ्याशुभ्र कुरडया, रंगीबेरंगी पापड आणि शेवया यांचा दरवळ परिसरात पसरला आहे. वर्षभराच्या साठवणीसाठी महिलांची धांदल…
सावधान! आंब्याच्या गोडीत रसायनांचा ‘विष’
कॅल्शियम कार्बाइडचा संशय; कृत्रिम पिकवणाऱ्यांवर कारवाई करा पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – उन्हाळ्याच्या हंगामात पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठांत आंब्यांची आवक वाढली आहे. मात्र या गोड फळामागे रसायनांचा धोका लपलेला असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या…
दापोडीत बेकायदेशीर दारूसाठा जप्त
पिंपरी, दि. 3 (प्रतिनिधी) – दापोडी परिसरात बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठवून ठेवलेला १६ हजार १९५ रुपयांचा दारूसाठा अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १ मे) रोजी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास करण्यात आली.…
कासारसाई येथे भिंत पाडून ऑफिस कंटेनरची चोरी
पिंपरी, दि. 3 (प्रतिनिधी) – मुळशी तालुक्यातील कासारसाई येथे एका खासगी प्लॉटमधील १ लाख २५ हजार रुपये किमतीचा लोखंडी ऑफिस कंटेनर जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना १० ऑगस्ट २०२५ मध्ये सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी डॉ. पंकज पोपटराव…
अश्लील चाळे करणाऱ्या महिलेवर कारवाई
पिंपरी, दि. 3 (प्रतिनिधी) – दिघी-आळंदी रोडवर सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून आणि येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करून सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणाऱ्या एका महिलेवर दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २ मे) रोजी…