घरगुती वादातून पत्नीला बेदम मारहाण
चिखली गावठाण येथील चिंतामणीनगर परिसरात घरगुती वादातून एका ६५ वर्षीय व्यक्तीने घरात झोपलेल्या आपल्या पत्नीला लोखंडी पट्टीने बेदम मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (९ जून) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात…
तळेगाव एमआयडीसी मध्ये वॉटर एटीएम फोडले
तळेगाव चाकण रोडवर माळवाडी येथे उघड्या जागेत बसवलेले वॉटर एटीएम फोडून अज्ञात चोराने त्यातील गल्ल्यातून अंदाजे १० हजार रुपयांची नाणी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (९ जून) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणात ऋषीकेश मसु साखरे (३१, माळवाडी,…
‘तू मालकाचा चमचा आहेस’ म्हणत तरुणावर हल्ला
हिंजवडी येथील हुलावळे वस्तीत जुन्या रागातून एका तरुणाने फिर्यादीला ‘तू मालकाचा चमचा आहेस’ असे म्हणत शिवीगाळ केली आणि लोखंडी हत्याराने डोक्यावर व हातावर मारून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (१० जून) रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. बालाजी…
शासनाचे आदेश कागदावरच? पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध प्रवासी वाहतूक आजही सुरूच
५ ते १५ जून विशेष मोहिमेची घोषणा; मात्र शहरात कारवाईचा मागमूस का नाही, प्रवाशांचा सवाल पिंपरी-चिंचवड : एसटी बसस्थानकांच्या आणि अधिकृत थांब्यांच्या २०० मीटर परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ५ ते १५ जूनदरम्यान विशेष अंमलबजावणी…
“मोदींनी 12 वर्षांत सुट्टी का घेतली नाही?”; नेहरूंचा विक्रम मोडल्यानंतर ठाकरे गटाची टीका, मोदी-नेहरू तुलना पुन्हा चर्चेत
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे सर्वाधिक काळ सेवा करणारे पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळाचा विक्रम मागे टाकल्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मोदी आणि…
कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात महिला ठार झाली असून तिचे वडिल गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मोशी येथील इंडियन ऑईल काजळे पेट्रोल पंपाजवळ बुधवारी (दि. १० जून) रोजी दुपारी सव्वातीन…
तरुणाला मारहाण करून मोबाइल, रोकड लांबवली
पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – एका तरुणाला गाठून लाथाबुक्यांनी मारहाण करत जबरदस्तीने मोबाइल आणि रोकड चोरून नेली. ही घटना पिंपरी रेल्वे स्टेशन जवळील भारतनगर सार्वजनिक शौचालयापाशी मंगळवारी (दि. ९ जून) रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली. तोहीद…
Pimpri-Chinchwad ट्रॅफिक बडीच्या माध्यमातून महिनाभरात १,३६५ तक्रारींचा निपटारा
व्हॉट्सॲपवरील एका संदेशाने वाहतूक समस्यांवर उपाय; पिंपरी-चिंचवडकरांचा वाढता विश्वास पिंपरी-चिंचवड : वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग, सिग्नल बिघाड किंवा नियमभंग करणाऱ्या वाहनांची तक्रार करण्यासाठी आता नागरिकांना पोलीस ठाणे किंवा वाहतूक शाखेच्या कार्यालयात…
रोपे लावणे सोपे; पण तीन वर्षे जगविणार कोण? शाळांना ५० झाडांचे लक्ष्य; पिंपरी-चिंचवडमध्ये जागेचा प्रश्न अन् संगोपनाचे मोठे आव्हान
पिंपरी, — शालेय शिक्षण विभागाने ‘एक पेड माँ के नाम ३.०’ अभियानांतर्गत प्रत्येक शाळेला किमान ५० रोपे लावण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडसारख्या दाट लोकवस्तीच्या आणि वेगाने विकसित होत असलेल्या शहरात वृक्षारोपणासाठी पुरेशी जागा उपलब्ध…