मुंबईत मुसळधार पावसातही विमानसेवा सुरू; मिटी नदी परिसरात धावपट्टीवर विमान उड्डाणासाठी सज्ज
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र असताना, मिटी नदी परिसरालगत असलेल्या मुंबई विमानतळावर विमानसेवा सुरळीत सुरू असल्याचे पाहायला मिळाले. धावपट्टीवर एक विमान उड्डाणासाठी सज्ज असल्याचे दृश्य समोर आले आहे. सततच्या पावसातही…
मूक जनावराला वाचवण्यासाठी भोसरीत ‘रेस्क्यू ऑपरेशन’; दुर्दैवी अंतानंतर गोसेवकांचे पाणावले डोळे
भोसरी : एकीकडे मुसळधार पावसामुळे माणसांची धावपळ उडालेली असताना, दुसरीकडे एका मूक जनावराचा जीव वाचवण्यासाठी भोसरीतील स्थानिक नागरिक आणि गोरक्षकांनी आपल्या प्राणाची बाजी लावल्याची एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. धावडे वस्ती येथील बैलगाडा घाटाच्या…
Delhi-हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळ कतारच्या LNG जहाजावर संशयित ड्रोन हल्ला; गुजरातकडे येणाऱ्या जहाजावरील चारही भारतीय सुरक्षित
नवी दिल्ली : हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळील ओमानच्या आखातातून गुजरातमधील दहेज बंदराच्या दिशेने प्रवास करणाऱ्या कतारच्या LNG वाहतूक जहाज ‘LNGC Al Rekayyat’ वर संशयित ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत जहाजाच्या इंजिन रूममध्ये आग लागून धुराचे लोट…
Delhi-मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय; AI गुंतवणुकीसाठी ४,८०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले
नवी दिल्ली : जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टने यंदाच्या वर्षातील दुसऱ्या मोठ्या नोकरकपातीची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २.१ टक्के म्हणजेच ४,८०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.…
Mumbai-हिंदुस्तानी भाऊंचा मोठा दावा; ‘ठाकरेंचे आमदार-नगरसेवकही फुटणार’, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिंदुस्तानी भाऊ यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी ठराविक तारीख सांगत उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आमदार आणि नगरसेवकही फुटणार असल्याचा दावा…
Ahilyanagar-अहिल्यानगरला यलो अलर्ट; सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
अहिल्यानगर : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज अहिल्यानगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात…
राजकीय घडामोडींना वेग? एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी विनोद तावडे यांची सदिच्छा भेट; नव्या समीकरणांची चर्चा
जळगाव : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. ही भेट केवळ सदिच्छा भेट…
Pimpri-Chinchwad-पूरग्रस्तांच्या मदतीपेक्षा प्रसिद्धीची धावपळ?; ‘रीलस्टार’ लोकप्रतिनिधींवर नागरिकांची टीका खरे कौतुक अग्निशामक दल, पोलीस, महावितरण, आरोग्य कर्मचारी आणि प्रशासनाचे; संकटात जीव धोक्यात घालणाऱ्यांनाच सलाम
पिंपरी-चिंचवड : शहरावर मुसळधार पावसामुळे नैसर्गिक संकट कोसळले असताना एका बाजूला अग्निशामक दल, पोलीस, महावितरण, आरोग्य कर्मचारी आणि विविध शासकीय यंत्रणा जीवाची पर्वा न करता मदतकार्य करत होत्या. तर दुसऱ्या बाजूला काही लोकप्रतिनिधी आणि सोशल मीडियावरील…
Pimpri-Chinchwad-पावसाने अनेकांचे नुकसान… पण गॅरेजवाल्यांचे ‘अच्छे दिन’! इंजिनमध्ये पाणी शिरल्याने शेकडो वाहने बंद; दुरुस्तीसाठी गॅरेजवर वाहनधारकांची गर्दी
पिंपरी-चिंचवड : शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अनेक भागांत रस्त्यांवर आणि निवासी वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने चारचाकी व दुचाकी वाहने पाण्यात अडकली. काही वाहनचालकांनी पाणी साचलेल्या रस्त्यांतून वाहने नेण्याचा प्रयत्न…
पालघरच्या पूरग्रस्त भागांचा गिरीश महाजन यांचा दौरा; पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी वैज्ञानिक अभ्यास होणार
पालघर : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा करून पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदत व बचावकार्याची प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना आवश्यक…