जगातील सातव्या क्रमांकाचे उंच शिखर माउंट धौलागिरी पुण्याच्या भगवान चवले यांनी केले पादाक्रांत
भगवान चवले यांनी १८ एप्रिल २०२६ रोजी माउंट धौलागिरी हे शिखर सर केले आहे. भगवान चवले हे मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या लव्हार्डे येथील रहिवासी आहेत.एलआयसी (LIC) मध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी १७ मे २०१८ रोजी सकाळी…
आळंदीत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेवर कारवाई
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील स्कायवॉकखाली वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई शनिवारी (दि. १८ एप्रिल) रोजी करण्यात आली. याप्रकरणी महिला पोलीस…
राष्ट्रध्वज जाळल्या प्रकरणी दिल्लीतील तरुणाला अटक
भारताचा राष्ट्रध्वज जाळल्या प्रकरणी दक्षिण चाकण पोलिसांनी दिल्ली येथील एका तरुणाला अटक केली आहे. तरुणाने राष्ट्र्ध्वज अर्धवट जाळून तो कचऱ्यात फेकला. ही घटना १६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास ठाकरवस्ती चौक, चाकण येथे घडली. असिफ शेख (२९,…
खाकीतील माणुसकी! मोरवाडी बीट मार्शलने मिळवून दिली हरवलेली सोन्याची अंगठी
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला जागत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या प्रामाणिकपणाचा आणि तत्परतेचा प्रत्यय दिला आहे. गस्तीवर असताना सापडलेली सोन्याची अंगठी आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकीट मूळ…
हिंजवडीत रॉग साईडने आलेल्या रिक्षा चालकावर गुन्हा
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – हिंजवडी आयटी पार्क परिसरात चुकीच्या बाजूने (रॉग साईड) रिक्षा चालवून प्रवाशांच्या आणि स्वतःच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या रिक्षाचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी दुपारी…
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला एक गुंड आदेशाचा भंग करून बेकायदेशीररीत्या शहरात आला. तसेच त्याने बंदी आदेश असतानाही कोयता जवळ बाळगला. याप्रकरणी पोलिसांनी त्याला खेड तालुक्यातील कडाचवाडी…
बहिणीशी का बोलतो? विचारत तरुणाचे अपहरण करून मारहाण; पाच जण अटकेत
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – ‘तू माझ्या बहिणीशी का बोलतो?’ असा जाब विचारत एका तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गाडीत घालून पळवून नेले. ही घटना उर्से टोलनाका येथे शनिवारी (दि. १८ एप्रिल) रोजी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास…
दोन आरोपींकडून पिस्तुल जप्त रावेतमध्ये गुंडा विरोधी पथकाची कारवाई
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – रावेत येथील किवळे रोडवर गुंडा विरोधी पथकाने सापळा रचून दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी…
देहूरोड परिसरात गावठी पिस्तुलसह तरुण जेरबंद
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – देहूरोड येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मागे पोलिसांनी कारवाई करत एका २० वर्षीय तरुणाला बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. १८ एप्रिल) रोजी सायंकाळी…
तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे बसस्थानक परिसरात एका २२ वर्षीय विद्यार्थ्याला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत १४ हजार रुपये लुटले. ही घटना शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. करण आनंद घाडगे (वय १९…