अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे म्हाळुंगे स्विचिंग उपकेंद्राला मिळणारा वीजपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू
पुणे (प्रतिनिधी): एका अज्ञात वाहनाने मंगळवारी (दि. २१) दुपारी ५ वाजेच्या सुमारास धडक दिल्याने ४०० केव्ही कुरुळी अतिउच्च दाब उपकेंद्रातून निघणाऱ्या २२ केव्ही म्हाळुंगे स्विचिंग इनकमर आणि २२ केव्ही एमआयडीसी डबल सर्किट फीडरला आज (दि. २१) फटका बसला आहे.…
सायबर गुन्हेगारांच्या टोळीला मोका शहर पोलिसांच्या इतिहासात प्रथमच अशी कारवाई
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – सायबर गुन्हेगारीच्या जगात मोठी खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सायबर चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. एका संघटित सायबर टोळीवर थेट ‘मोका’ अंतर्गत कारवाई केली आहे. सायबर…
पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका: चाकणचा मटका किंग रफीक काझी जेरबंद; MPDA अंतर्गत रवानगी थेट अमरावती कारागृहात!
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेत मोठी यश संपादन केले आहे. दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीत सराईतपणे मटका आणि जुगार अड्डे चालविणारा कुख्यात आरोपी रफीक शगीर काझी (३९) याला…
कामास नकार दिल्याने वेल्डरला मारहाण; बहिणीचा विनयभंग
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – दिघी परिसरात कामाला नकार दिल्याच्या कारणावरून एका तरुणाला बिअरच्या बाटलीने मारहाण केली. तसेच याचा जाब विचारणा-या बहिणीचाही विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. २० एप्रिल) रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ममता चौकाजवळ…
तडीपार गुंडाला कासारवाडीत कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार असतानाही शहरात विनापरवाना वावरणाऱ्या आणि जवळ शस्त्र बाळगणाऱ्या एका तडीपार गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. १९ एप्रिल) रोजी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास…
हिंजवडीत गांजा विक्री करणाऱ्या तस्करास अटक; ३४८ ग्रॅम मुद्देमाल जप्त
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – अंमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी परिसरात छापा टाकून गांजाची विक्री करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून गांजा आणि मोबाइल असा एकूण २७ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. बिपिन कुमार…
खराबवाडीतून पिस्तुलासह अल्पवयीन ताब्यात
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई चाकण जवळील खराबवाडी परिसरात सोमवारी (दि. २०…
फ्लॅट विक्रीत ९२ लाखांची फसवणूक; दोन बँकांचे कर्ज असतानाही केला व्यवहार
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – पिंपरी येथील एका फ्लॅटवर दोन बँकांचे कर्ज असताना केवळ एकाच बँकेचे कर्ज असल्याची खोटी माहिती देऊन एका व्यक्तीची ९२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ४ जानेवारी २०२२ ते १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडली. युनुस…
निगडीत टोळक्याचा राडा; नंबरप्लेट बसवणाऱ्या तरुणाला मारहाण
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – निगडी परिसरात दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लुटल्यात आले. ‘मी इथला भाई आहे’ अशी आरडाओरड करून आरोपीने परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (दि. १९…
भोसरी एमआयडीसीतील कंपनीला आग ६ बंबांच्या साहाय्याने आगीवर मिळवले नियंत्रण
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक वसाहतीचा भाग असलेल्या भोसरी एमआयडीसीमध्ये सोमवारी (दि. २० एप्रिल) रोजी पहाटे आगीची घटना घडली. टी-ब्लॉक मधील एका कंपनीत लागलेली ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अल्पावधीत…